बारामती, 23 फेब्रुवारी, जितेंद्र जाधव : राष्ट्रवादीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण यावरून पोस्टरबाजी रंगली असल्याचं सध्या दिसून येत आहे. राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर खासदार सुप्रिया सुळे यांचं पोस्टर लावण्यात आलं होतं. या पोस्टरवर सुप्रिया सुळे यांचा उल्लेख पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री असा करण्यात आला होता. त्यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नावाचे देखील पोस्टर लावण्यात आले होते. मात्र या पोस्टरवरून सुप्रिया सुळे यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. त्यांनी या पोस्टरवरून नराजी व्यक्त केली आहे.
नेमकं काय म्हटलं सुप्रिया सुळे यांनी?
पोस्टर कोणी लावले, त्या पोस्टरवर माझा फोटो कोणी लावला? एकतर पोस्टर कोणी लावले त्याचा पुरावा असला पाहिजे. कोणालाही दुसऱ्याचे पोस्टर त्याला न विचारला लावण्याचा अधिकार नाही. एका महिलेचा फोटो परवानगीशिवाय पोस्टरवर लावण्याचा कोणालाही अधिकार नाही. जर असं पोस्टर कोणी लावलं असेत आणि त्याच्यावर कोणी लावलं त्याचं नाव नसेल तर, मी मुंबई पोलिसांना विनंती करते की त्यांनी न्याय मिळून द्यावा असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : कसब्यात भाजपची प्रतिष्ठा पणाला; मास्टर प्लॅन तयार, 'या' नेत्यावर सोपवली जबाबदारी
अजित पवारांच्या पोस्टरवर प्रतिक्रिया
दरम्यान यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या पोस्टरवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील यांचे पोस्टर त्यांच्या कार्यकर्त्यांनी लावले होते. मात्र माझ्या आणि अजितदादांच्या पोस्टरमध्ये साम्य आहे. दोन्ही पोस्टरवर पोस्टर लावणऱ्याचं नाव नाहीये. त्यामुळे हा आमच्या दोघांवर अन्याय आहे. मी मुंबई पोलिसांना विनंती करते की त्यांनी कारवाई करावी असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar, NCP, Sharad Pawar, Supriya sule