पुणे, 5 फेब्रुवारी : सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल केला आहे. देशात दररोज कुठेना कुठे धार्मिक मोर्चे निघत असल्याचं पहायला मिळत आहे. या धार्मिक मोर्चांवरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. आमचं घर हे सत्यशोधक आहे. हे आम्ही कृतीतून दाखवून देतो, आम्ही लिंग भेद मानत नाही. मला आणि दादाला घरात समान अधिकार आहेत, म्हणूनच मी आता अशा धार्मिक मोर्चांना विरोध करायचं ठरवलं आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. त्या सत्यशोधक समाज परिषदेमध्ये बोलत होत्या. नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? आमचं घर हे सत्यशोधक आहे. हे आम्ही कृतीतून दाखवून देतो, आम्ही लिंग भेद मानत नाही. मला आणि दादाला घरात समान अधिकार आहेत, म्हणूनच मी आता अशा धार्मिक मोर्चांना विरोध करायचं ठरवलं आहे. एक दिवस धर्मासाठी हे असले मोर्चे बंद झाले पाहिजेत, त्याला विरोध करण्यासाठीच आजची ही सत्यशोधक समाज परिषद भरल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. ‘शरद पवार यांची मुलगी असल्याचा अभिमान’ दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी आपल्या बालपणीची एक आठवण देखील सांगितली. मी शाळेत असताना साहेब म्हणायचे जेढी बुद्धीमत्ता तेवढेच मार्क पडतील. पण संसदेत माझा पहिला नंबर आला आणि माझा आत्मविश्वास वाढत गेला, आपण शरद पवार यांची मुलगी आहोत याचा अभिमान वाटला असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.