मराठी बातम्या /बातम्या /पुणे /पुण्यात निर्बंध जैसे थेच; पर्यटन स्थळी बंदी कायम, नागरिक फिरताना दिसले तर होणार कारवाई

पुण्यात निर्बंध जैसे थेच; पर्यटन स्थळी बंदी कायम, नागरिक फिरताना दिसले तर होणार कारवाई

Pune Lockdwon: पुण्यात (Pune) अजूनही कोरोनाचा प्रार्दुभाव दिसून येत आहे. अजित पवारांनी कोरोनाची आढावा बैठक घेतली आहे.

Pune Lockdwon: पुण्यात (Pune) अजूनही कोरोनाचा प्रार्दुभाव दिसून येत आहे. अजित पवारांनी कोरोनाची आढावा बैठक घेतली आहे.

Pune Lockdwon: पुण्यात (Pune) अजूनही कोरोनाचा प्रार्दुभाव दिसून येत आहे. अजित पवारांनी कोरोनाची आढावा बैठक घेतली आहे.

पुणे, 10 जुलै:  पुण्यात (Pune) अजूनही कोरोनाचा प्रार्दुभाव दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यात (Pune Corona Virus) तेच निर्बंध (Lockdown) कायम ठेवण्यात आले आहेत. येत्या आठवड्यातही पुण्यात तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू असणार आहेत. शनिवार, रविवार विकेंडला अत्यावश्यक सुविधा वगळता कडक निर्बंध लागूच राहणार आहेत. तसंच पर्यटन स्थळी बंदीच असेल.

पुणे शहर आणि जिल्ह्यात निर्बंध जैसे थे राहणार आहे. दुकानांची सकाळी 8 ते दुपारी 4 ची मुदत संपल्यावरही फेरीवाले, हातगाडीवाले फिरतायत त्यांना फिरू देऊ नका. तसंच 5 वाजता संचारबंदी लागू झाल्यानंतर जर दुकाने उघडी राहिली, नागरिक फिरताना दिसले तर कडक कारवाई करा असे आदेश पालकमंत्री अजित पवार यांनी काल कोरोना आढावा बैठकीनंतर दिले आहेत.

पुण्यात काय सुरू, काय बंद?

पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा अंतर्गत दुकाने आठवड्यात सर्व दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार

अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार 4 वाजेपर्यंत सुरू तर शनिवार रविवार पुर्णपणे बंद

मॉल्स, सिनेमागृहं संपूर्ण बंद.

रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत आसनक्षमतेच्या पन्नास टक्के क्षमतेने आणि शनिवाररविवार फक्त पार्सल सेवा 11 पर्यंत.

खाजगी कार्यालयं कामाच्या दिवशी पन्नास टक्के क्षमतेने दुपारी 4 वाजेपर्यंत

अत्यावश्यक सेवा संबंधी शासकीय कार्यालयं शंभर टक्के क्षमतेने

उद्याने, मैदाने आठवड्यातील सर्व दिवस पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत.

हेही वाचा- आनंदाची बातमी! पुणेकर लवकरच करणार गारेगार मेट्रोनं प्रवास

अजित पवारांनी घेतली आढावा बैठक

पुण्यातील कोरोनाच्या स्थितीची आढावा बैठक (Pune Covid situation review meeting) घेतल्यावर पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेतली. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही आहे. लसीकरण सुरू आहे मात्र, नागरिकांनी नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. कारण, आज एक गोष्ट प्रकर्षाने समोर आला आहे तो म्हणजे कोविड प्रतिबंधक लसींचे दोन डोस घेतल्यानंतरही काहींना कोरोनाची बाधा होऊन मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे हे सर्व गांभीर्याने घ्या असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नागरिकांना दिला आहे.

हेही वाचा- केवळ 'या' दोन राज्यांमुळे देशावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं संकट? 

दोन दिवस झाले लस नाही

पुण्यात 50 लाख लसीकरणाचा टप्पा पार केला आहे पण दोन दिवस झाले लस नसल्याने लसीकरण बंद आहे. लस पुरवठा होईल तसं लसीकरण करत आहोत. मृत्यू दर कमी झालाय पण लोकांनी मास्क वापरण्याची गरज आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त धोका असल्याने खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.

First published:

Tags: Ajit pawar, Coronavirus, Lockdown, Pune, Pune cases