मराठी बातम्या /बातम्या /देश /महाराष्ट्र आणि केरळ राज्यात अजूनही परिस्थिती चिंताजनक, या राज्यांमुळे देशावर तिसऱ्या लाटेचा धोका

महाराष्ट्र आणि केरळ राज्यात अजूनही परिस्थिती चिंताजनक, या राज्यांमुळे देशावर तिसऱ्या लाटेचा धोका

COVID-19 3rd Wave: देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचं सांगण्यात येत आहे. देशातल्या दोन राज्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आहे.

नवी दिल्ली, 10 जुलै: भारतात कोरोना व्हायरसच्या (COVID-19) रुग्णांचा आकडा आता दिवसेंदिवस कमी होत आहे. जवळपास दोन महिन्यांनंतर बऱ्याच राज्यातील परिस्थिती सुधारत आहे. मात्र अजूनही अशी अनेक जिल्हे आहेत जिथे कोरोना रुग्णांचा आकडा कमी होत नाही आहे. बर्‍याच जिल्ह्यांमध्ये रुग्णांचा आकडा जास्त आहे. त्यामुळे रुग्णांमध्ये झपाट्याने होणारी वाढ ही चिंतेचा विषय बनली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गुरुवारी बाजारपेठेत आणि इतरत्र वाढणारी गर्दी तसंच कोरोनाच्या नियमांचं पालन न करणे यावर चिंता व्यक्त केली आहे.

देशात जरी काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा कमी होत असला तरी केरळ आणि महाराष्ट्र राज्यात कोरोनाची परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या राज्यातल्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली होती. या दोन्ही राज्यांमध्ये दररोजची कोरोना रुग्णांची संख्या जरी कमी असली तर कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्याही जास्त आहे.

दोन्ही राज्यात, गेल्या आठवड्यात देशात झालेल्या कोरोना व्हायरसपैकी 50 टक्के रुग्ण या दोन राज्यातून आली आहेत. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे, महाराष्ट्र राज्य अजूनही दुसऱ्या लाटेतल्या प्रकरणातून पहिल्या लाटेच्या स्थितीत पोहोचू शकला नाही आहे. केरळमध्ये पुन्हा एकदा रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. राज्यात, 8 जुलै वगळता गेल्या महिन्यात कोरोनाची दोन वेळा नव्या रुग्णांचा आकजा 15 हजारांच्या वर गेला होता.

हेही वाचा- मुंबईत कोरोना नियम शिथिल होण्याची शक्यता

या जिल्ह्यांमध्ये परिस्थिती गंभीर

केरळमध्ये मल्लापुरम, कोट्टायम, कासारगोड, कोझिकोड आणि थिसूरमध्ये कोरोनाची आकडेवारी चिंताजनक आहे. केरळमधील 14 जिल्ह्यांपैकी जवळपास अर्ध्या भागात गेल्या महिन्यापासूनच कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहेत. मल्लापुरम, कोट्टायम, कासारगोडमध्ये कोरोना व्हायरसचे प्रमाण नियमितपणे वाढत आहे. तर कोट्टायम आणि थिसूरमध्ये ही रुग्णांची संख्या वाढत ही नाही आणि कमीही होत नाहीत.

महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि ठाणे येथे कोविड 19 च्या रुग्णांचा आकडा जरी कमी असला तरी प्रमाण अधिक आहे. त्यामुळे अजूनही बऱ्याच ठिकाणी कोरोनाचा संसर्ग दिसून येत आहे.

हेही वाचा-  मुंबई महापालिकेच्या 'त्या' निर्णयाला स्थगिती, मुंबईकरांना तात्पुरता दिलासा

महाराष्ट्रात संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यताही (Possibility of third wave) वर्तवण्यात आली आहे. हे लक्षात घेता राज्य सरकारने (Maharashtra Government) राज्य सरकारी कर्मचारी (Government Employees) आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या प्रत्येक वर्षी एप्रिल आणि मे महिन्यात सर्वसाधारण बदल्या करण्यात येतात. मात्र, सद्यस्थितीत राज्यात कोविड19 या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव अद्याप आटोक्यात आला नसल्यानेत तसेच तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता बदल्यांच्या संदर्भात निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता 2021-22 या चालू आर्थिक वर्षी मर्यादित स्वरुपात 14 ऑगस्ट 2021 पर्यंत बदल्या करण्यात याव्यात त्यानंतर कोणत्याही बदल्या करु नयेत असा निर्णय घेण्यात आला आहे.

First published:

Tags: Corona virus in india, Kerala, Maharashtra