Home /News /pune /

पुण्यातील पुरंदरमध्ये राष्ट्रवादीला फटका, प्रस्थापित गाव पुढाऱ्यांना सपशेल नाकारलं

पुण्यातील पुरंदरमध्ये राष्ट्रवादीला फटका, प्रस्थापित गाव पुढाऱ्यांना सपशेल नाकारलं

पुरंदर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत वेगळंच चित्र पाहायला मिळालं आहे. मतदारांनी प्रस्थापित गाव पुढाऱ्यांना नाकारल्याचं स्पष्ट झालं आहे.

पुणे, 18 जानेवारी: राज्यात 15 जानेवारीला झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. पुणे जिल्ह्यात महाविकास आघाडीने सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला जात आहे. तर भाजपनेही अनेक ठिकाणी सत्ता राखल्याचा प्रतिदावा केला आहे. मात्र, पुरंदर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत वेगळंच चित्र पाहायला मिळालं आहे. मतदारांनी प्रस्थापित गाव पुढाऱ्यांना नाकारल्याचं स्पष्ट झालं आहे. काँग्रेस आणि शिवसेनेत चुरस आहे असून राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. हेही वाचा...पवारांच्या बारामतीत 'कमळ' कोमजले, 20 वर्षानंतर फडकला राष्ट्रवादीचा झेंडा! पुरंदर तालुक्यातील 68 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडली.12 ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. तर 1 ग्रामपंचायतीच्या (पिंगोरी) निवडणुकीवर बहिष्कार होता. उर्वरित 55 ग्रामपंचायतींची मतमोजणी सोमवारी पार पडली. या निवडणुकीत मतदारांनी प्रस्थापित गाव पुढाऱ्यांना नाकारल्याचं दिसून आलं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका पातळीवरील नेत्यांना आपल्या ग्रामपंचायती राखता आल्या नाहीत. जिल्हा परिषदेचे माजी आदर्श सदस्य सुदाम इंगळे यांच्या हातातून वाळुंज ग्रामपंचायत निसटली. दुसरे नेते जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम समिती अध्यक्ष दत्ताजी चव्हाण यांना निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला तर ग्रामपंचायत ही गमवावी लागली. माजी मंत्री विजय शिवतारे यांनी परींचे ग्रामपंचायत राखली आहे. माजी आमदार अशोक टेकवडे यांनी जवळार्जुन ग्रामपंचायत एकहाती राखली आहे राष्ट्रवादीचे नेते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय कोलते यांना ही पिसर्वे ग्रामपंचायत राखता आली नाही. त्यांचे बंधू सुरेश कोलते यांना निवडनुकीत पराभवाचा सामना करावा लागला. तर भाजपचे बाबा जाधवराव यांना दिवे ग्रामपंचायत राखण्यात यश मिळालं. हेही वाचा...Gram Panchayat Result 2021: पुण्यात कुठे फुललं कमळ तर कुठे राष्ट्रवादीचं वर्चस्व राष्ट्रवादीला दे धक्का... त्याचबरोबर सर्वात मोठ्या नीरा ग्रामपंचायतीत कॉंग्रेस पुरस्कृत नीरा विकास पॅनल विजयी झालं आहे. काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांनी दिला राष्ट्रवादीला धोबीपछाड दिला आहे. 17 पैकी 10 जागांवर काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत चव्हाण पॅनलला अवघ्या 4 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. 3 जागा भैरवनाथ पँनलला मिळाल्या आहेत. आमदार संजय जगताप यांच्यासाठी ही निवडणूक मोठ्या प्रतिष्ठेची झाली.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Ajit pawar, Pune, Pune (City/Town/Village), पुणे

पुढील बातम्या