मराठी बातम्या /बातम्या /पुणे /आधुनिक पुणे जिल्ह्याचा असाही चेहरा, आजीबाईंना न्यावे लागले झोळीतून रुग्णालयात!

आधुनिक पुणे जिल्ह्याचा असाही चेहरा, आजीबाईंना न्यावे लागले झोळीतून रुग्णालयात!

उपचाराकरता हलवलं आणि गाव डोंगरात असल्यानं दुर्गम भाग असल्यानं झोळीत टाकून त्यांना नेण्यात आलं.

उपचाराकरता हलवलं आणि गाव डोंगरात असल्यानं दुर्गम भाग असल्यानं झोळीत टाकून त्यांना नेण्यात आलं.

उपचाराकरता हलवलं आणि गाव डोंगरात असल्यानं दुर्गम भाग असल्यानं झोळीत टाकून त्यांना नेण्यात आलं.

पुणे, 16 मार्च :  पुणे (Pune) जिल्ह्यातील वेल्हे तालुका (Velha taluka) हा दुर्गम समजला जातो. या तालुक्यात काही भागांत रस्ते नाहीत, वीज नाही. यामुळे जर कुणी आजारी पडले तर रुग्णाला दवाखान्यात पोचवणे जिकिरीचं काम होतं आहे. कारण, रस्ते नसल्याने रुग्णवाहिका (Ambulance) वापरण्याचा प्रश्न निकालात निघतो. नुकताच एका आजीबाईंना झोळीतून नेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने पुन्हा एकदा हा प्रश्न चर्चेत आला आहे.

वेल्हे तालुक्यातील चांदर गावातील आजीबाई आजारी पडल्या. चांदरगाव कोकणजवळ असल्यानं त्यांना महाड इथं उपचाराकरता हलवलं आणि गाव डोंगरात असल्यानं दुर्गम भाग असल्यानं झोळीत टाकून त्यांना नेण्यात आलं. महिनाभर उपचार घेऊन त्या परत गावी आल्या तेव्हाचा व्हिडिओ आणि फोटो समोर आला. वेल्हे तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते गणेश राऊत यांनी हा व्हिडीओ देऊन माहिती दिली.

VIDEO: कर्जबाजारी पाकिस्तानात आकाशातून नोटांचा पाऊस; पैशांसाठी लोकांची झुंबड

चांदर हे पुण्यातील वेल्हा तालुक्यातील पानशेत धरण भागातील  दुर्गम भागात असलेल्या गावातील मागील एक महिन्यापासून आजारी असल्याने महाड येथील सरकारी रुग्णालयात उपचार घेत होती. आता थोडं बरं वाटतंय म्हणून ती परत गावी आली.  या गावात यायला अजूनही रस्ते नाही त्यामुळे पायाशिवाय पर्याय नाही. लिली आजी अजूनही चालण्याएवढी बरी झाली नाही. पण जुन्या लोकांची फार इच्छा असते, शेवटचा श्वास तरी आपल्या मातीत घ्यावा. ती यासाठीच गावात परत आली असावी, असं गणेश राऊत यांनी सांगितलं.

फडणवीसांनी आणखी एका मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांना घेरलं, विचारला आक्रमक सवाल

'गावात आणताना तिच्या मुलांची काय अवस्था झाली असेल हे या  फोटो वरून आपल्याला कल्पना आली असेल. शहरातील भिरभिर फिरणाऱ्या ऍम्ब्युलन्स आणि या गावातील ही अवस्था पाहिली की या गावांतील लोकांना सापत्न भावाची वागणूक का ? भागात, तालुक्यात नेते म्हणवणारे विकासाच्या मुद्द्यावर का बोलत नाही, इतक्या वर्षांनी दुखणी डोळ्यातील पाणी दिसत नाही का ? स्वतः आलिशान गाड्यांमधून मिरवणारे अशा परिस्थिती स्वतःच्या घरच्यांना स्वतः राहणार का?  कधी बदलणार ही परिस्थिती ? लीला आजींचे संपूर्ण आयुष्य अशाच अवस्थेत गेले त्यांच्या मुलांचे नातवनडांचे ही जाणार का? विकसित भारत /तालुका /सर्व काही बोलण्यापूरतेच का? असे सवाल गणेश राऊत यांनी उपास्थित केले.

First published:
top videos

    Tags: Maharashtra, Mumbai, Pune, Shocking news, Transport