नारोवाल, 16 मार्च: सध्या जगात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्था डबघाईला आल्या आहेत. जगातील अनेक देश कर्जबाजारी झाले आहेत. यामध्ये जगाची महासत्ता असणाऱ्या अमेरिकेसह पाकिस्तानचाही समावेश आहे. आपला देश दिवाळखोरीत निघत असताना, पाकिस्तानातील एका लग्नात मात्र लाखो रुपयांची उधळण करण्यात आली आहे. पाकिस्तानातील नारोवाल याठिकाणी नुकत्याच पार पडलेल्या एका लग्नात नवरदेवाकडील कुटुंबीयांनी एका इमारतीच्या छतावर चढून लाखो रुपयांची उधळण (Currency notes rain in Pakistan) केली आहे. यामुळे पाकिस्तानसोबत अनेक ठिकाणी या लग्नाची जोरदार चर्चा (Viral Video) सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील नारोवाल जिल्ह्यातील मंडी बहाउद्दीन याठिकाणी आकाशातून पैशांचा पाऊस पाडण्यात आला आहे. एका लग्न समारंभासाठी आलेल्या वऱ्हाडी मंडळींवर आकाशातून लाखो रुपयांचा वर्षाव करण्यात (Currency notes rain at wedding ceremony) आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून याबाबत अनेक प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. आकाशातून उधळलेली रक्कम साधारणतः 2 मिलियन अर्थात 20 लाख रुपयांच्या आसपास असल्याचं बोललं जात आहे.
संबंधित नवऱ्या मुलाचा भाऊ अमेरिकेत राहतो, तो आपल्या भावाच्या लग्नासाठी पाकिस्तानात परतला होता. यावेळी नवरदेवाच्या भावाने आणि इतर नातेवाईकांनी इमारतीच्या छतावर चढून पैशांची उधळण केली आहे. यावेळी हे हवेत उडणारे पैसे वेचण्यासाठी लहान मुलांसह अनेकांनी गर्दी केली होती. व्हिडीओत, लहान मोठ्यांसहित अनेक जण पैसे गोळा करतांना दिसत आहेत.
An hour of currency notes rain at the wedding ceremony in #Narowal, city of #Pakistan. The bridegroom's brother & relatives climbed on the roof of the shop & showered 2 million notes. Thousands of rupees were looted by childrens from wedding party. @LandofPakistan @ShowbizAndNews pic.twitter.com/XDJLK2PYCZ
— ADNAN HAMEED (@AHQ600) March 14, 2021
(वाचा -पाकिस्तानात ज्यांच्या समाधीस्थळाची तोडफोड झाली ते स्वामी अद्वैतानंद कोण?)
विशेष बाब म्हणजे पाकिस्तानात असं पहिल्यांदाच घडलं नाही. यापूर्वीही गुजरांवाला याठिकाणी एका उद्योगपतीनं आपल्या मुलाच्या लग्नात वऱ्हाडी मंडळींवर लाखो डॉलर्सची बरसात केली होती. याचाही व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यावेळी लोकांनी महागड्या गाड्यांवर उभं राहून पैशाची उधळण केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money, Pakistan, Social media viral, Viral, Viral video., Wedding