मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुण्यामध्ये सावत्र भावावर केला कुऱ्हाडीने हल्ला, कबुतरांवरून झाला होता वाद

पुण्यामध्ये सावत्र भावावर केला कुऱ्हाडीने हल्ला, कबुतरांवरून झाला होता वाद

Pigeon

Pigeon

कबुतराला खुराड्यातून बाहेर सोडले म्हणून त्या माणसावर त्याच्या सावत्रभाऊ व सावत्र आईने क्रूर हल्ला केला.

पुणे, 09 फेब्रुवारी : कबुतरांना खुराड्यातून बाहेर काढल्याचा राग धरुन एकाने आपल्या सावत्र भावावर (Step Brother) कुऱ्हाडीने वार केल्याची घटना पुणे जिल्ह्यातील चिखली येथे घडली. याबाबत सागर कांबळे (वय 28, रा. बोल्हाईमळा) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार त्यांच्या सावत्र आई आणि सावत्र भावाने अन्य पाच जणांसह हल्ला करीत गंभीर जखमी केल्याचे म्हटले आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, ही घटना 5 फेब्रुवारीला रात्री घडली. यावेळी सागर यांचा लहान भाऊ श्रीधर याने त्रास होतो म्हणून कबुतरांना खुराड्यातून बाहेर काढत घरातून बाहेर मोकळे सोडले. या खुराड्यातील सर्व पक्षी हे त्यांचा सावत्र भाऊ सिध्देश्वर कांबळे (Siddhshwar Kambale) याच्या मालकीचे होते. कबुतरांना सोडले हे कळताच सिध्देश्वर आणि इतरांनी सागर यांच्या डोक्यावर, पाठीवर, हातावर आणि पायावर कुऱ्हाडीने वार केले, यावेळी शेजाऱ्यांनी त्यांना घट्ट पकडून ठेवण्याचाही प्रयत्न केला. घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या सागर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन पळ काढला. त्यानंतर चिखली पोलीस स्टेशनमध्ये हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(हे वाचा -  पुणे महापालिकेत जोरदार राडा, मुख्य सभेच्या आयोजनावरून विरोधक आक्रमक)

याबाबत माहिती देताना पोलिस उपनिरीक्षक एस.पी. देशमुख म्हणाले, की जखमी व्यक्ती आता धोक्याबाहेर आहे. परंतु, त्याला अनेक ठिकाणी गंभीर जखमा झालेल्या आहेत. आरोपींना अटक करण्यासाठी शोधमोहिम सुरु केली आहे. पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) आणि पुण्यात (Pune) कबुतरांच्या खुराड्यावरुन वाद झाल्याची अनेक प्रकरणे सातत्याने नोंदवली जात आहेत.

गेल्या वर्षी उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) कबुतरांच्या कारणांवरुन असाच वाद झाला होता, त्यात एका तरुणाने शेजाऱ्यांकडील 11 कबुतरांना मारुन टाकले होते. अहवालानुसार, राहुल सिंह याने घराच्या छतावरुन शेजारी असलेल्या धरमपाल सिंह यांच्या घरात उडी मारली, त्यानंतर तेथील पिंजऱ्यात असलेल्या 11 कबुतरांना दगडाने ठेचून मारले होते. या घटनेनंतर धरमपाल सिंह यांनी मृत कबुतरांचा व्हिडीओ तयार केला आणि फरार राहुल सिंह विरोधात एफआयआर (FIR) दाखल केला.

(हे वाचा-धक्कादायक! दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम केलं म्हणून विवाहितेला मिळाली तालिबानी शिक्षा)

धरमपाल सिंह म्हणाले, की राहुल माझ्या घरासमोर सातत्याने थुंकत होता. कोरोना महामारीच्या काळात असे थुंकणे योग्य नसल्याचे त्याला वारंवार सांगितले, परंतू तो त्याकडे दुर्लक्ष करीत होता. या अपमानाचा बदला घेण्यासाठी राहुल याने माझ्या मालकीच्या कबुतरांना मारुन टाकले.

First published:

Tags: Crime, Crime news, Pimpari chinchavad, Police, Pune