मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

Valentine Week मधील धक्कादायक बातमी, दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम केलं म्हणून विवाहितेला मिळाली तालिबानी शिक्षा

Valentine Week मधील धक्कादायक बातमी, दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम केलं म्हणून विवाहितेला मिळाली तालिबानी शिक्षा

एका विवाहितेने दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम केल्याची अत्यंत अमानुष अशी शिक्षा देण्यात आल्याची घटना घडली आहे. या सगळ्या क्रुर प्रकाराचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे

आग्रा, 09 फेब्रुवारी: एका प्रेमी जोडप्याच्या तोंडाला काळे फासून त्यांच्या गळ्यात चपलांचा हार घालून गावभर त्यांची धिंड काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या आग्रा जिल्ह्यात शुक्रवारी ही घटना घडली आहे. याठिकाणी एका महिन्यापासून बेपत्ता असलेली महिला आपल्या प्रियकरासोबत गावामध्ये पोहचली. तिने आपल्या प्रियकरासोबत लग्न केले. यामुळे संतप्त झालेल्या तिच्या सासरच्या लोकांनी रस्त्याच्या मध्ये दोघांना उभं करत आधी त्यांच्या तोंडाला काळे फासले. त्यानंतर त्यांच्या गळ्यात चपलांचा हार घालून त्यांची गावभर धिंड काढली.

तरुणाने चपलांचा हार घालण्यास नकार दिल्यामुळे गावकऱ्यांनी लाथाबुक्यांनी त्याला मारहाण केली आणि त्याला शिवीगाळ केली. त्यानंतर जबरदस्तीने त्याच्या गळ्यामध्ये चपलांचा हार घातला. मिळालेल्या माहितीनुसार, जाखा गावामध्ये राहणारी २० वर्षीय महिला महिनाभरापूर्वी आपल्या घरातून बेपत्ता झाली होती. या महिलेच्या सासरच्या लोकांनी तिला बऱ्याच ठिकाणी शोधले पण ती सापडली नाही.

(हे वाचा-ज्वेलर्सला हनी ट्रॅप करणे पडले भारी, 2 महिलांची 'वरात' निघाली पोलिसांच्या दारी)

दरम्यान शुक्रवारी अचानक सकाळी ती आपल्या प्रियकरासोबत गावामध्ये पोहचली. या महिलेने प्रियकरासोबत लग्न केले होते. महिला आणि तिच्या प्रियकराला पाहून तिचा पती आणि सासरची मंडळी संतप्त झाली. त्यांनी दोघांच्या तोंडाला काळं फासून त्याच्या गळ्यात चपलांचा हार घालून गावभर वरात काढली.

(हे वाचा - Facebookवर जमलेल्या प्रेमानंतर त्याने लग्नास दिला नकार, 250 किमी प्रवास करत प्रेयसीनं गाठलं घर आणि..)

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये महिलेच्या पतीचा समावेश आहे. अछनेरा पोलीस ठाण्याचे एसएचओ उदयवीर मलिक यांनी सांगितले की, 'जाखा गावामध्ये शुक्रवारी महिला आणि तिच्या प्रियकराला शिक्षा म्हणून गावकऱ्यांनी चपलांनी मारहाण केली आणि त्यांच्या गळ्यात चपलांचा हार घातल्याची घटना समोर आली. या घटनेचा कथित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओची माहिती घेऊन अछनेरा पोलिसांनी याप्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.'

First published:

Tags: Up Police, Uttar pardesh, Yogi government