• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • देवेंद्र फडणवीस म्हणाले, शरद पवारांशी आमचे कितीही मतभेद असले तरी...

देवेंद्र फडणवीस म्हणाले, शरद पवारांशी आमचे कितीही मतभेद असले तरी...

शरद पवार यांनी मेट्रोबाबत अहवाल वाचावा

  • Share this:
पुणे, 20 डिसेंबर: मुंबई मेट्रो कारशेडचा (Mumbai Metro Car shade)   गुंता आता दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हा प्रश्न सोडवण्यासाठी मध्यस्थी करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दिली आहे. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, शरद पवार यांनी मेट्रोबाबत अहवाल वाचावा. शरद पवारांशी आमचे कितीही मतभेद असले तरी पवारसाहेब अहवाल वाचतील आणि प्रॅक्टिकल निर्णय घेतील. ते कधीही चुकीचा निर्णय घेणार नाहीत, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. देवेंद्र फडणील पुण्यात बोलत होते. हेही वाचा...शेतातील उभ्या पिकासह शेतमालकावर केली करणी! पुण्यातील धक्कादायक प्रकार उघड भाजपची कायम सहकार्याची भूमिका.. मेट्रो प्रकल्पात राज्य सरकार इतकाच निधी केंद्र सरकारचा सुद्धा आहे. केंद्राच्या मदतीने JICA ने या प्रकल्पाला वित्तपुरवठा केला आहे. मुंबईकरांच्या हितासाठी केंद्र सरकारनं यापूर्वीसुद्धा महाराष्ट्राला सहकार्य करण्याची भूमिका घेतली. यापुढेसुद्धा सहकार्याचीच भूमिका केंद्र सरकारची असेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. आरेच्या जागेला सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. आरेची जागा अंतिम झाल्यानंतर काम सुद्धा बरेच पुढे गेले आणि 100 कोटी रुपयांचा खर्चही झाला. लोकशाहीत चर्चेला आमची कायमच तयारी असते आणि चर्चेतून मार्गही निघतो. मनात शंका असेल तर आज आरे कारशेडला जी जागा दिली, त्यापेक्षा एक इंच जास्त जागा भविष्यात दिली जाणार नाही, असा निर्णय करा, आम्ही त्याला पाठिंबा देऊ, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. आता दुराग्रह सोडून द्यावा आणि मुंबईकरांच्या हितासाठी आरेच्या जागेवर कारशेडचा मार्ग तत्काळ प्रशस्त करावा, अशी आमची सरकारला विनंती असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. हेही वाचा...मुंबईकरांनी आधीच खूप भोगलंय, आणखी त्रास नको; देवेंद्र फडणवीसांनी जोडले हात काय म्हणाले नवाब मलिक? मेट्रो कारशेडचा प्रश्न सोडवण्यासाठी आता शरद पवार मध्यस्थी करणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.  या वादावर शरद पवार पुढील एक-दोन दिवसांत पंतप्रधान मोदी यांच्याशी देखील ते चर्चा करणार आहेत.
Published by:Sandip Parolekar
First published: