जुन्नर, 20 डिसेंबर: शेतातील उभ्या पिकासह शेतमालकावर (Farmer) करणी अर्थात अघोरी विद्या (Black Magic)केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पुणे (Pune) जिल्ह्यातील जुन्नर (Junnar) तालुक्यातील कांदळी गावात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून या प्रकारामुळे शेतकरीवर्गात दहशत निर्माण झाली आहे. या प्रकरणी नारायणगाव पोलिसांत (Narayangaon Police) पीडित शेतकऱ्यानं दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हिराबाई हरिभाऊ फुलवडे (रा. सुतारठीके, कांदळी, ता. जुन्नर) असं पीडित महिला शेतकरीचं नाव आहे. हेही वाचा… मानलं बुवा शिवसेना नेत्याला! लग्नात वायफळ खर्च टाळून सावरला गोरगरिबांचा संसार कांदळी येथील एका महिला शेतकऱ्याच्या शेतातील कांदा रोपावर अज्ञात माथेफिरूनं तणनाशक फवारून सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान केले आहे. साधारणपणे ही घटना 9 डिसेंबर ते 14 डिसेंबर या दरम्यान घडली असावी, अशी माहिती या महिलेची मुलगी सुरेखा निघोट यांनी पोलिसांना दिली आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी तणनाशकाचा परिणाम दिसून पूर्णपणे कांदारोप जळून गेली आहेत. याशिवाय शेतामधील पाईप लाईनच्या बाऱ्याची तोडफोड करुन नुकसान केलं आहे. महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन अज्ञात माथेफिरूनं या महिलेच्या शेतामध्ये लिंबं कापून ठेवली. तसेच मंगळसूत्र, नारळ, अंडी त्याचप्रमाणे काळ्या बाहुलीची पूजा करून जादूटोणा व मंत्रतंत्राचा वापर केला आहे. सुरूवातीला या जादूटोण्याकडे यांनी दुर्लक्ष केले होते परंतु तणनाशकाचा प्रभाव दिसल्यानं याबाबत शेतकरी हिराबाई हरिभाऊ फुलवडे (रा. सुतारठीके, कांदळी, तालुका जुन्नर) यांनी नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. हेही वाचा.. ग्लोबल टिचर अवार्ड मिळवणारे रणजितसिंह डिसले गुरुजींची आणखी एक अचिव्हमेंट या आधी देखील असा प्रकार समोर आला होता. जुन्नर तालुक्यात यापूर्वी द्राक्ष बाग, डाळिंबाची बाग अज्ञात माथेफिरुंनी छाटून उद्ध्वस्त केली होती. तसेच आता कांदा चोरी, बटाटा चोरी, त्याचप्रमाणे कांदा रोपांच्या चोरी पाठोपाठ कांदा रोपांवर तणनाशक फवारणी यासारखा घृणास्पद प्रकार घडला आहे. असे कृत्य करणाऱ्यावर कारवाई होईल का? असा सवाल शेतकऱ्यांकडून केला जात आहे. या माथेफिरूंवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून करण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.