मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

मंत्रालयात अनेक झारीतले शुक्राचार्य, आरक्षणाचा लाभ मिळू देत नाही, भुजबळांचं मोठं विधान

मंत्रालयात अनेक झारीतले शुक्राचार्य, आरक्षणाचा लाभ मिळू देत नाही, भुजबळांचं मोठं विधान

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे

पुणे, 28 नोव्हेंबर: मंत्रालयात अनेक झारीतले शुक्राचार्य असतात. त्यांच्यामुळे आरक्षणाचा लाभ मिळतच नाही, असं मोठं विधान करून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. छगन भुजबळांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्य भूवया उंचावल्या आहेत.

बार्टी, सारथीप्रमाणे, महाज्योतिला दीडशे कोटी द्या, असा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक जिल्ह्यात OBCमुलींसाठी वसतिगृह द्यावेत. सावित्रीबाईं फुले घरकुल योजना सुरू करावी, अशी आमची मागणी असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं.

हेही वाचा...'मास्क' हेच एक 'व्हॅक्सिन' समजा, डॉ. तात्याराव लहाने यांनी दिला धोक्याचा इशारा

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने छगन भुजबळ यांच्याहस्ते शनिवारी पुण्यात पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांना पुण्यात शनिवारी 'समता पुरस्कार' प्रदान करण्यात आला. यावेळी छगन भुजबळ बोलत होते.

छगन भुजबळ म्हणाले, इतर मागासवर्गीयांची स्वतंत्र जनगणना करायला हवी. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. पण आता एक महाशय हायकोर्टात गेले आणि म्हणतात अनेकजण OBC चं आरक्षण बेकायदेशीर घेत आहेत. हे चुकीचच आहे

त्यासाठी तुम्हाला आंदोलनला तयार रहावं लागेल. तुम्हाला आरक्षण टिकवायचं असेल तर तुम्हाला काम करावं लागेल, असा सल्ला त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला. OBC ना आरक्षण 10 वर्षांचा लढ्यानंतर मिळालेलं आहे.

दगडूशेठ गणपतीसमोर दरवर्षी अथर्वशीर्षाचं पठण करणाऱ्या हजारो महिलांना बाजूलाच असलेल्या सावित्रीबाईंच दर्शन कधी का घ्यावं वाटलं नाही, सावित्रीबाईंनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. ज्यामुळे महिला वाचू शकतात, लिहू शकतात, असंही छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितलं. महात्मा फुलेंनी आपल्याला लढायला शिकवलं. त्यासाठीची प्रेरणा आज इथून घेऊन जायचं आहे. आपल्या आरक्षणावर, हक्कांवर गदा येत असेल तर लढायलाच लागेल, असं संदेश छगन भुजबळ यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला.

हेही वाचा...अमृता यांच्यावरील टीकेवरून फडणवीसांनी दिला सेनेच्या नेत्यांना इशारा, म्हणाले...

दरम्यान, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने दरवर्षी महात्मा फुले पुण्यतिथी समता दिनाच्या निमित्ताने 'महात्मा फुले समता पुरस्कार' सामाजिक, राजकीय, साहित्य, पत्रकारिता यासारख्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना देण्यात येतो. या अगोदर माजी केंद्रीय कृषीमंत्री खा.शरदचंद्र पवार, माजी केंद्रीय मंत्री विरप्पा मोईली, खा.शरद यादव, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव, ज्येष्ठ लेखक डॉ.भालचंद्र नेमाडे, डॉ.बी.एल.मुणगेकर, लेखिका अरुंधती रॉय, प्रा.डॉ.मा.गो.माळी, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, प्रा.हरी नरके यांच्यासह अनेक दिग्गजांचा समता पुरस्काराने गौरव करण्यात आलेला आहे.

First published:

Tags: Chagan bhujbal, Maratha kranti morcha, Maratha reservation, Protest maratha kranti morcha, Pune, Pune news