Home /News /mumbai /

अमृता यांच्यावरील टीकेवरून फडणवीसांनी दिला सेनेच्या नेत्यांना इशारा, म्हणाले...

अमृता यांच्यावरील टीकेवरून फडणवीसांनी दिला सेनेच्या नेत्यांना इशारा, म्हणाले...

'आम्ही कधीही कुणाच्या घरच्यांवर हल्ला करत नाही. आम्ही कधीही टीका केली नाही. आम्ही संयम बाळगतो.'

    मुंबई, 28 नोव्हेंबर : माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृत्ता फडणवीस (Amruta Fadanvis) या ना त्या मुद्यावरून ठाकरे सरकारवर टीका करत असतात. आता देवेंद्र फडणवीस सुद्धा त्यांच्या बाजूने मैदानात उतरले असून टीका करणाऱ्या शिवसेनेच्या (Shivsena) नेत्यांना थेट इशारा दिला आहे. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. तसंच अमृता फडणवीस यांच्यावर टीका करणाऱ्या सेनेच्या नेत्यांना देवेंद्र फडणवीस यांनी खडेबोल सुनावले आहे. 'आम्ही कधीही कुणाच्या घरच्यांवर हल्ला करत नाही. आम्ही कधीही टीका केली नाही. आम्ही संयम बाळगतो. माझ्या पत्नीच्या संदर्भात शिवसेनेचे अधिकृत नेते काय बोलता, काय टीका करता, काय टीव्ट करता, हे सर्वांनी पाहिले आहे. पण मी कांगावा करत नाही. मी राजकारणात आहे. मी उत्तराला उत्तर हे उत्तरानेच देईल' असा इशारा फडणवीस यांनी दिला. तसंच, 'मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतून  महाराष्ट्राला दिशा मिळेल अशी अपेक्षा होती, पण तसं काही झाले नाही.  महाराष्ट्राच्या इतिहासात धमकी देणार असा मुख्यमंत्री मी पाहिला नाही. त्यांची वक्तव्य हे शोभणीय नाही. नुसती धमकी देणारी भाषा ही नाक्यावर होत असते, वर्षपूर्तीनिमित्ताने होत नसते. विरोधकांना चिरडण्याची भाषा ज्यांनी ज्यांनी केली, ते फार काळ टिकले नाही, अशी टीकाही फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांनी केली. हे सरकार विश्वासघाताने आले आहे. जनतेचा विश्वासघात करून सत्तेत आला आहात. कारण, एका पक्षासोबत युती करून मतं मागितली. पंतप्रधान मोदी यांचा चेहरासमोर ठेवून त्यांच्या नावाने मतं मागितली. त्यामुळे हे सरकार विश्वासघातातून आलेले सरकार आहे. सत्तेवर आल्यानंतर एका वर्षातील उपलब्धी काय आहे, फक्त स्थगिती देण्यात आली. स्थगिती देण्यापलीकडे या सरकारकडे काहीही केले नाही, अशी टीकाही फडणवीस यांनी केली. 'आरे कारशेड प्रकल्पाचे सत्य आम्ही मुंबईतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवणार आहे. आरे कारशेडचा निर्णय हा मुंबई विरोधी आहे. काही अधिकारी हे मुख्यमंत्र्यांचा ईगो मसाज करत आहे. हा निर्णय मुंबईकरांच्या निर्णयाविरोधातला निर्णय आहे. त्यामुळे याचे सत्य छोट्या पुस्तकीतून लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. 'अर्णब आणि कंगनाच्या सर्व विचारांशी आम्ही सहमत नाही. पण कंगना रणौत आणि अर्णब गोस्वामी प्रकरणी सर्वोच्च न्यायालय आणि पालिकेला चपराक लगावली आहे. त्यामुळे आम्हाला महाराष्ट्रद्रोही म्हणणारे न्यायालयाला सुद्धा महाराष्ट्रद्रोही म्हणणार आहे का? राज्य सरकारने कुणावर कारवाई करणार हे स्पष्ट करावे, गृहमंत्री अनिल देशमुख आता माफी मागणार आहे का? असा थेट सवाल फडणवीस यांनी उपस्थितीत केला.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या