'मास्क' हेच एक 'व्हॅक्सिन' समजा, डॉ. तात्याराव लहाने यांनी दिला धोक्याचा इशारा

कोरोनाची दुसरी लाट येईल सौम्य असेल की तिव्र, ती नक्की कधी येईल, हे सांगता येणार नाही

कोरोनाची दुसरी लाट येईल सौम्य असेल की तिव्र, ती नक्की कधी येईल, हे सांगता येणार नाही

  • Share this:
पुणे, 28 नोव्हेंबर: राज्यात कोरोनाबाधितांची (Coronavirus) आकडेवारी कमी होत आहे. त्याचबरोबर मृतांच्या संख्येतही घत होताना दिसत आहे. मात्र, बहुताश नागरिक कोरोना संकटाला फारसं गांभीर्यानं घेताना दिसत नाही आहेत. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने (Dr Tatyarao Lahane ) यांनी मास्क (Mask)न वारणाऱ्या नागरिकांना एक धोक्याचा इशारा दिला आहे. कोरोनाची दुसरी लाट येईल सौम्य असेल की तिव्र, ती नक्की कधी येईल, हे सांगता येणार नाही. 'मास्क' हेच एक व्हॅक्सिन समजा. मास्क अनिवार्य आहे, असं डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितलं. कोरोनाची दुसरी लाट आणण्याचं काम आपणच करत असल्याचंही डॉ.लहाने यांनी यावेळी सांगितलं. हेही वाचा...न दिलेलं वचन लक्षात पण दिलेलं विसरले, फडणवीसांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांना पुण्यात शनिवारी 'समता पुरस्कार' प्रदान करण्यात आला. समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्याहस्ते डॉ. तात्याराव लहाने यांना 'समता पुरस्कार' प्रदान करण्यात आला. एक लक्ष, मानपत्र, शाल आणि स्मृतीचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. यावेळी प्रतिपादन करताना डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितलं की, कोविड-19 ला प्रतिबंधित करण्यासाठी राज्य सरकारनं घेतलेले सर्व निर्णय वैज्ञानिक आहेत. त्यामुळेच आपण या महारोगाला रोकू शकलो. किडनी बदललेली असल्यानं मला कॉविड काळात सुट्टी घेण्यासाठी सांगण्यात आलं होतं. मात्र, माझ्यासमोर महात्मा फुले यांचा आदर्श असल्यानं सेवा हाच धर्म मानून मी कार्य करत राहिलो. हा पुरस्कार माझा अभिमान वाढवणारा आहे.  स्वीकारताना मला आनंद होत असल्याच्या भावना डॉ. तात्याराव लहाने यांनी यावेळी व्यक्त केल्या. दरम्यान, यंदाच्या वर्षी या पुरस्कारासाठी पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांची निवड करण्यात आली आहे. पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी वैद्यकीय क्षेत्रात यश संपादन करत समाजासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी केलेलं हे कार्य केवळ राज्यातील नाही तर देशभरातील वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या आणि येऊ इच्छिणाऱ्या नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. नेत्र शस्त्रक्रियेच्या अत्याधुनिक तंत्रात त्यांनी प्रभुत्व मिळवून महाराष्ट्रातील तसेच देशभरातील ग्रामीण भागातील गोर गरिब आणि आदिवासी भागात नेत्ररोग्यांना शस्त्रक्रियेच्या माध्यमातून दृष्टी प्राप्त करून दिली. हेही वाचा...कोरोना लस घेतल्यानंतर...; लशीच्या SIDE EFFECT बाबतही तज्ज्ञांनी केलं सावध पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी आजवर दीड लाखांहून अधिक शस्त्रक्रिया व 50 लाखांहून अधिक रूग्णांवर यशस्वी उपचार करून वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी इतिहास घडविलेला आहे. तसेच वैद्यकीय शिक्षण विभागात काम करतांना अनेक तज्ज्ञ डॉक्टर त्यांनी घडवले आहेत. त्यांच्या या वैज्ञानिक ज्ञानासाठी आणि आपल्या अफाट सामाजिक कार्यासाठी त्यांना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने मानाचा 'समता पुरस्कार' देऊन गौरवण्यात आलं आहे.
Published by:Sandip Parolekar
First published: