पुणे, 10 एप्रिल : राष्ट्रवादीचा आज 24 वा वर्धापन दिन आहे. 24 व्या वर्धापन दिनीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे कोणतीही जबाबदारी सोपवण्यात आलेली नाहीये. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. यावर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले काकडे? दरम्यान अजित पवार यांच्याकडे जबाबदारी का देण्यात आली नाही, याबाबत राष्ट्रवादीचे नेते आणि प्रवक्ते अंकुश काकडे यांनी मोठा खुलासा केला आहे. अजित पवार यांना केंद्रामध्ये जाण्याची इच्छा नाहीये, त्यांना राज्यात काम करायचं आहे, त्यामुळे त्यांच्यावर इतर राज्याची जबाबदारी सोपवण्यात आली नसावी असं अंकुश काकडे यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांच्याकडे राज्यात मोठी जबाबदारी असल्याचंही ते यावेळी म्हणाले.
Ajit Pawar : सुप्रियाताईंना नव्या इनिंगसाठी अजितदादांच्या शुभेच्छा, म्हणाले…सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. ‘माझ्याकडे कार्यकारी अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी दिल्याबद्दल मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष मा. पवार साहेब, सर्व ज्येष्ठ नेते, पक्षाचे सहकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांचे आभार मानते. पक्षातील सर्व कार्यकर्ते ज्यांच्यामुळे आपण हा पल्ला गाठू शकलो. त्यांच्यासोबत काम करून , राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी मजबूत करण्यासाठी मी परिश्रमपूर्वक काम करेल’ असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

)







