पुणे, 02 मार्च : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीची मतमोजणी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. एकीकडे कसब्यात काँग्रेसने भाजपच्या बालेकिल्ल्यावर झेंडा फडकावला आहे. तर चिंचवडमध्ये महाविकास आघाडीला बंडखोरीचा फटका बसला आहे. राहुल कलाटे यांनी तब्बल 13 हजारांपेक्षा जास्त मतं मिळवली आहे.
चिंचवडमध्ये आतापर्यंत 13 व्या फेरीचे मतदान पूर्ण झाले आहे. अश्विनी जगताप यांना 46320 मतं मिळाली आहे. तर राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांना 37962 मतं मिळाली आहे. तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना 14171 मतं मिळाली आहे. त्यामुळे कलाटे यांच्या बंडखोरीचा नाना काटे यांना फटका बसला आहे. जर नाना काटे यांनी उमेदवारी दाखल केली नसती तर सर्वाधिक मतही नाना काटे यांनी पडली असती. त्यामुळे नाना काटे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला असता. पण, कलाटे यांच्या उमेदवारीचा भाजपला फायदा झाला आहे.
पिंपरी चिंचवड तेरावी फेरी -
- अश्विनी जगताप - ३६४९ भाजप, ८१९६ मतांनी आघाडीवर
तर, दुसरीकडे, पोस्टल मतदानामध्ये काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आघाडी घेतली ती आतापर्यंत कायम आहे. मतमोजणीपासून धंगेकर यांनी तब्बल 6 हजार 700 मतांनी आघाडी घेतली आहे. तर रासने यांना 50490 मतं मिळाली आहे. भवनी पेठे हा भाजपचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये सुद्धा भाजपची पिछेहाट झाली आहे. धंगेकर यांनी मोठी आघाडी घेतली असून विजयाकडे वाटचाल केली आहे. 15 वी फेरीत 6700 मतांनी धंगेकर निर्णायक आघाडीवर आहे. त्यामुळे भाजपचे उमेदवार रासने पराभवाच्या गडद छायेत आहे.
(कसब्यात विजय आणि चिंचवडमध्ये पराभव, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया)
या दोन्ही जागांसाठी रविवार 26 फेब्रुवारीला मतदान झालं होतं. भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली. कसब्यामधून भाजपचे हेमंत रासने यांचा सामना काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांच्याशी होता. तर चिंचवडमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळाली. चिंचवडमध्ये भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना तर राष्ट्रवादीने नाना काटे यांना रिंगणात उतरवलं. अपक्ष म्हणून राहुल कलाटेही रिंगणात उतरले होते.
(कुटुंबाला उमेदवारी नाकारली म्हणून भाजपचा पराभव? कुणाल टिळक म्हणाले...)
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 50.06 टक्के मतदान झालं. या मतदारसंघामध्ये एकूण 2,75,679 एवढे मतदार आहेत, यातल्या 1,38,018 जणांनी मतदानाचा हक्क बजावला, यापैकी 74,218 पुरुष आणि 63,800 महिलांचा समावेश होता. दुसरीकडे चिंचवड विधानसभेमध्ये 50.47 टक्के मतदान झालं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Congress, NCP, Pune, Pune Bypoll Election, Shiv sena