पुणे, 02 मार्च : पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी न दिल्याचे कारणही भाजपच्या पराभवासाठी ग्राह्य धरलं जात आहे. पण मुद्यावर कुणाल टिळक यांनी ही शक्यता नाकारली आहे. पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीचा निकाल अखेर लागला आहे. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहे. धंगेकर यांनी 11 हजार 40 मतांनी विजय मिळवत भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला आहे. या पराभवावर मुक्ता टिळक यांचा मुलगा कुणाल टिळक यांनी प्रतिक्रिया दिली. ‘रवींद्र धंगेकर यांचं अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीला पाठिंबा देतो. भाजपचा पराभव का झाला आहे. कुठे मतं कमी पडली, कुठे चुकलं, याचा पक्षाच्या नेत्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. प्रत्येक बुथवर जाऊन प्रचार करावा लागणार आहे, असं कुणाल टिळक म्हणाले.
कुटुंबामध्ये उमेदवारी असती तर चित्र वेगळं असतं का? आता हा प्रश्न विचारण्याची गरज नाही. उमेदवारी जाहीर झाली, आम्ही सगळे कुटुंबीय प्रचाराला सामील झालो होते. देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली, सगळ्या नेत्यांनी सभा घेतली. पण पराभव का झाला, याचा विचार करण्याची गरज आहे. ज्या चुका झाल्यात त्याचा विचार केला पाहिजे. आम्ही जेव्हा प्रचाराला उतरलो होतो, त्यावेळी लोकांनीही भाजपला मतदान करणार असं सांगितलं. शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही प्रचार केला होता. आता कुठे तरी दुर्दैव म्हणावं लागेल, धंगेकर हे वेगळ्या प्रचारासाठी ओळखले जातात. कुणाची चूक झाली? पक्षश्रेष्ठींची कुठे चूक झाली, असं म्हणणार नाही. सगळ्याच नेत्यांनी प्रचार केला होता. कुठे ना कुठे तरी आम्ही कमी पडलो. विकासाचा अजेंडा असेल, विविध मुद्दे, हिंदु मुस्लिम जे मुद्दे आहे, त्याचा विचार केला पाहिजे. आम्ही पोहोचून पण तिथे पोहचू शकलो नाही. ब्राह्मण समाजाचा फटका बसला? ब्राह्मण समाजामुळे फटका बसला असं म्हणता येणार नाही, कारण आमच्याकडे जो रिपोर्ट आले आहे. त्यानुसार, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, शुक्रवार पेठ आहे, तिथे प्रामुख्याने ब्राह्मण समाज भाजपला मतदान करत असतो. पण यावेळी ब्राह्मण समाजाच्या मतदानाची संख्या झाली आहे, असा खुलासाही टिळक यांनी केला.