Home /News /mumbai /

न दिलेलं वचन लक्षात पण दिलेलं विसरले, फडणवीसांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला

न दिलेलं वचन लक्षात पण दिलेलं विसरले, फडणवीसांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला

'मी मुख्यमंत्र्यांची मुलाखत मानत नाही. कारण ती तेवढ्या लायकीची नाही. पाच वर्ष राज्य चालवणार असं सांगताय, खुशाल चालवा. पण काम कुठे केले तेही दाखवा'

    मुंबई, 28 नोव्हेंबर : 'वचनपूर्ती केल्याचे म्हणत आहात, पण मुख्यमंत्री न करण्याचे वचन लक्षात आहे, पण शेतकऱ्यांना जे वचन दिले ते लक्षात नाही', असं म्हणत भाजपचे (BJP) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackery) यांच्यावर सडकून टीका केली आहे. तसंच, महाराष्ट्राच्या इतिहासात धमकी देणार मुख्यमंत्री मी पाहिला नाही, असा टोलाही फडणवीसांनी लगावला. महाविकास आघाडी सरकारला वर्षपूर्ती झाली आहे.  देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकार घेऊन शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. 'मी मुख्यमंत्र्यांची मुलाखत मानत नाही. कारण ती तेवढ्या लायकीची नाही. पाच वर्ष राज्य चालवणार असं सांगताय, खुशाल चालवा. पण काम कुठे केले तेही दाखवा. मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतून कोणतीही महाराष्ट्राला दिशा मिळेल अशी अपेक्षा होती, पण तसं काही झाले नाही.  महाराष्ट्राच्या इतिहासात धमकी देणार मुख्यमंत्री मी पाहिला नाही. त्यांची वक्तव्य हे शोभणीय नाही. नुसती धमकी देणारी भाषा ही नाक्यावर होत असते, वर्षपूर्तीनिमित्ताने होत नसते. विरोधकांना चिरडण्याची भाषा ज्यांनी ज्यांनी केली, ते फार काळ टिकले नाही, अशी टीकाही फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांनी केली. 'हे सरकार विश्वासघाताने आले आहे. जनतेचा विश्वासघात करून सत्तेत आला आहात. कारण, एका पक्षासोबत युती करून मतं मागतात. पंतप्रधान मोदी यांचा चेहरासमोर ठेवून त्यांच्या नावाने मतं मागतात. त्यामुळे हे सरकार विश्वासघातातून आलेले सरकार आहे. आल्यानंतर एका वर्षातील उपलब्धी काय आहे, फक्त स्थगिती देण्यात आली. स्थगिती देण्यापलीकडे या सरकारकडे काहीही केले नाही', अशी टीकाही फडणवीस यांनी केली. 'आरे कारशेड प्रकल्पाचे सत्य आम्ही मुंबईतील प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहोचवणार आहे. आरे कारशेडचा निर्णय हा मुंबई विरोधी आहे. काही अधिकारी हे मुख्यमंत्र्यांचा ईगो मसाज करत आहे. हा निर्णय मुंबईकरांच्या निर्णयाविरोधातला निर्णय आहे. त्यामुळे याचे सत्य छोट्या पुस्तकीतून लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. 'अर्णब आणि कंगनाच्या सर्व विचारांशी आम्ही सहमत नाही. पण कंगना रणौत आणि अर्णब गोस्वामी प्रकरणी सर्वोच्च न्यायालय आणि पालिकेला चपराक लगावली आहे. त्यामुळे आम्हाला महाराष्ट्रद्रोही म्हणणारे न्यायालयाला सुद्धा महाराष्ट्रद्रोही म्हणणार आहे का? राज्य सरकारने कुणावर कारवाई करणार हे स्पष्ट करावे, गृहमंत्री अनिल देशमुख आता माफी मागणार आहे का? असा थेट सवाल फडणवीस यांनी उपस्थितीत केला.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या