Unlock 1.0 : तब्बल अडीच महिन्यांनंतर पुणेकरांसाठी खुली झाली ही ठिकाणं, पण..
Unlock 1.0 : तब्बल अडीच महिन्यांनंतर पुणेकरांसाठी खुली झाली ही ठिकाणं, पण..
लॉकडाऊन शिथिलीकरणाच्या पहिल्या टप्प्यात प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील उद्याने नागरिकांसाठी सशर्त खुली करण्याचा पुणे महानगरपालिकेने शहरातील निर्णय घेतला. पण प्रत्यक्षात नेमकं काय उघडलं आणि काय नाही?
पुणे, 4 जून : राज्य सरकारने कोरोना विषयक उपाययोजना संदर्भात केलेला लॉकडाऊन 5 टप्प्याटप्प्यानं उठवण्याबात मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यानुसार लॉकडाऊन शिथिलीकरणाच्या पहिल्या टप्प्यात प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील उद्याने नागरिकांसाठी सशर्त खुली करण्याचा पुणे महानगरपालिकेने शहरातील निर्णय घेतला आहे.
कोरोना अनलॉक 1 च्या पॉलिसीनुसार गुरुवारी पुण्यातील केवळ 31 उद्याने तब्बल अडीच महिन्यांनतर सशर्त खुली करण्यात आली आहेत. पण त्यातही वेळेच्या मर्यादेसोबतच इतरही निर्बंध असणार आहेत.
पुण्यात एकूण 204 बागा आणि उद्याने आहेत. उर्वरित उद्याने कोरोना कंटेंमेंट झोन उठल्यानंतरच खुली होणार अशी माहिती मिळाली आहे. थोडक्यात पहिल्या टप्पात फक्त जॉगिंग ट्र्रॅक म्हणून या बागांचा पुणेकरांना उपयोग करता येणार आहे.
काय आहेत निर्बंध?
-बागेत येणारअया प्रत्येक नागरिकांनी मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे.
- 10 वर्षे वयोगटातील लहान मुले, गरोदर महिला, 65 वर्षांपेक्षा जास्त वयोवृद्ध व्यक्ती, आजारी व्यक्तींना बागेत प्रवेशबंदी
- उद्यानात पान, तंबाखु खाणे आणि थुंकणे दंडणीय अपराथ असेल.
-उद्यानातील प्रचलित नियम नागरिकांस बंधनकारक राहतील.
-पुणेकरांना बागेत फक्त जॉगिंग करता येणार
-वेळ सकाळी 6 ते 8 तर सायंकाळी 5 ते 7
- सामुदायिक स्वरुपात उद्यानांचा वापर करता येणार नाही.
-नागरिकांनी उद्यानांमध्ये सामाजिक सुरक्षित अंतर ठेवून वैयक्तिक व्यायाम, जसे की धावणे, चालणे या शिवाय इतर कोणत्याही बाबींना परवानगी नसेल.
- उद्यानांमध्ये गर्दी होणार नाही तसेच जिम साहित्य, खेळणी, हिरवळ, बेंचेस आदींचा वापर करता येणार नाही.
- नागरिकांकडून कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक अटी व शर्तीचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता सुरक्षारक्षकांनी घ्यावी.
चक्रीवादळानंतरही शरद पवार लागले झपाटून कामाला, नेत्यांना दिला हा आदेश
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने बदललेली नियमावली जारी केली आहे. या नव्या नियमावलीत मुंबई मेट्रोपोलिटन रिझनमध्ये (MMR) प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, बदलापूर या मुंबई मेट्रोपोलिटन रिझनमधील महापालिका क्षेत्रातील नागरिकांना जिल्ह्याअंतर्गत प्रवास करता येणार आहे.
याशिवाय आऊटडोर फिजिकल अॅक्टिव्हिटी म्हणजे घराबाहेर व्यायाम करायला गेलात तर तुम्हाला ओपन जिममधील कोणतीही उपकरणं वापरता येणार नाहीत.
रस्त्याच्या दोन्ही बाजूची दुकाने एकाचदिवशी उघडण्यास परवानगी नाही. ऑड आणि इव्हन या नियमाप्रमाणे रस्त्याच्या एका बाजूची आणि दुसऱ्या बाजूची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.
अन्य बातम्याकेंद्र सरकारचा मोठा निर्णय, मंदिरं आणि रेस्टॉरंट्साठी गृहमंत्रालयाच्या गाईडलाईन्स
भारतात कोरोना योद्ध्यांना दिलं जातंय हे औषधं; पण क्लिनिकल ट्रायलमध्ये झालं फेल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.