भारतात कोरोना योद्ध्यांना दिलं जातंय हे औषधं; मात्र क्लिनिकल ट्रायलमध्ये झालंय फेल

भारतात कोरोना योद्ध्यांना दिलं जातंय हे औषधं; मात्र क्लिनिकल ट्रायलमध्ये झालंय फेल

या औषधाचा भारतात मोठा वापर केला जात आहे. मात्र क्लिनिकल ट्रायलमधून वेगळीच बाब समोर आली आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 4 जून : मलेरियावरील हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाबद्दल पुन्हा एकदा नवीन वृत्त समोर आले आहेत. वैद्यकीय जगातील एका वर्गाने या औषधाचे वर्णन कोरोना विषाणूविरूद्ध 'संजीवनी' असे केले आहे. भारतात कोरोना योद्ध्यांना हे औषध दिले जात आहे.

एवढेच नव्हे तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे औषधही घेत आहेत. दरम्यान, अमेरिकेत क्लिनिकल चाचणीनंतर हायड्रॉक्लोरोक्विन (एचसीक्यू) कोरोना विषाणूविरूद्ध उपयुक्त नसल्याची माहिती समोर आली आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या म्हणण्यानुसार अमेरिकेच्या मिनेसोटा विद्यापीठाने कोरोना विषाणूविरूद्ध हायड्रॉक्सीक्लोरोक्विन (एचसीक्यू) ची क्लिनिकल चाचणी केली. अमेरिका आणि कॅनडामधील 821 लोकांवर ही चाचणी घेण्यात आली. यानंतर विद्यापीठाची टीमने कोविड - 19 रोखण्यात हे औषध कुचकामी असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोहोचली आहे. याबाबतचा अहवाल न्यू इंग्लंड जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे.

अहवालात असे म्हटले आहे की, हायड्रॉक्सीक्लोरोक्विनची कोरोना विषाणूच्या रूग्णांना याचा फायदा झाला नाही. या चाचणीनंतर असे म्हणता येईल की कोविड -19 विरूद्ध हे औषध प्रभावी नाही. डब्ल्यूएचओने असेही म्हटले आहे की, कोरोना विषाणूविरूद्ध हे औषध प्रभावी नाही.

मे महिन्यात अमेरिकेने भारताकडून हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषध मागितले होते. यापूर्वी या औषधाच्या निर्यातीवर भारताने बंदी घातली होती. अमेरिका आणि इतर देशांच्या मागणीनंतर भारताने निर्यातीवरील बंदी उठविली आहे. अमेरिकेव्यतिरिक्त अनेक आफ्रिकन आणि आशियाई देशांना हे औषध भारताने दिले होते.

हे वाचा-चीनला दणका! भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान झाला नवा लष्करी करार

First published: June 4, 2020, 10:24 PM IST

ताज्या बातम्या