मुंबई 4 जून: राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार हे कोरोनाव्हायरसमुळे सध्या घरीच आहेच. वयाच्या 80व्या वर्षीही त्यांचा दिनक्रम हा सकाळी सहा वाजता सुरू होते असतो. कायम लोकांना भेटणं आणि त्यांची गाऱ्हानी ऐकून घेणं आणि त्यावर तोगडा काढणं हे अखंड सुरूच असतं. आता लॉकडाऊनच्या काळातही ते सातत्याने कामाचा आढावा शासन आणि प्रशासनाला सल्ले आणि सूचना देत आहेत. आता चक्रीवादळानंतरही पवारांनी पक्षनेत्यांची बैठक घेऊन मदत कार्याचा आढावा घेतला आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत मदत पोहोचेल याची काळजी घ्या अशी सूचना त्यांनी उपस्थित सर्व नेत्यांना केली. शरद पवार यांनी मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी बैठक घेऊन हा आढावा घेतला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे हे या बैठकीला उपस्थित होते. निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आणि मदतकार्याचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षनेत्यांसोबत आढावा घेतला आणि काही सूचनाही केल्यात. बुधवारी आलेल्या निसर्ग चक्रीवादळात राज्यात तीन जणांचा मृत्यू झाला होता. तर कोट्यवधींची हानी झाली होती. मुंबईत फारसा धिंगाणा न घालता हे वादळ पुढे निघून गेलं. सोसाट्याचा वारा आणि पाऊस यामुळे जनजीवन अस्ताव्यस्त झालं होतं. हे वाचा - केंद्र सरकारचा मोठा निर्णय, मंदिरं आणि रेस्टॉरंट्साठी गृहमंत्रालयाच्या गाईडलाईन् चीनला दणका! भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान झाला नवा लष्करी करार शाळा सुरू करणं या देशाला पडलं महागात; 250 मुलं कोरोनाग्रस्त, 6800 जण क्वारंटाइन
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.