केंद्र सरकारचा मोठा निर्णय, मंदिरं आणि रेस्टॉरंट्साठी गृहमंत्रालयाच्या या आहेत गाईडलाईन्स

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, मंदिरं आणि रेस्टॉरंट्साठी गृहमंत्रालयाच्या या आहेत गाईडलाईन्स

नव्या नियमांनुसार मंदीरात आता प्रसाद वाटप करण्यावर बंदी. सोबतच तीर्थ देण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 4 जून:  लॉकडाऊन नंतर आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. 8 जून नंतर देशातली मंदिरं आणि रेस्टॉरंट्स सुरू होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने धार्मिक स्थळांबाबत काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. तोंडावर मास्क लावणं, सॅनिटायझरचा वापर करणं, सोशल डिस्टन्सिंग कटाक्षाने पाळणं असे नियम या आधीच सक्तिचे करण्यात आले आहेत. या नियमांचं पालन करणं हे सक्तीचं करण्यात आलं आहे.

हे नियम पाळले आणि स्वयंशिस्त पाळली तरच कोरोनापासून आपण दूर राहू शकतो अन्यथा नाही असंही तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

नव्या नियमांनुसार मंदीरात आता प्रसाद वाटप करण्यावर बंदी. सोबतच तीर्थ देण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे. मंदिरात भजन  कीर्तन करता येणार नाही. त्याच बरोबर सामूहिक प्रार्थना करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

हॉटेल मध्ये आता 50  टक्के ग्राहक एक वेळी बसवता येणार आहेत. हॉटेल मध्ये येणाऱ्या व्यक्तीचे सामान निर्जंतुक करण्याची सूचनाही देण्यात आली आहेत. सर्व मॉल्स, रेस्टॉरंट्स, धार्मिक उपासना स्थळे, कंटेनमेंट झोनमधील हॉटेल आणि कार्यालये अद्याप बंदच राहतील.

कोरोनामुळे बदललं हॉटेल्स-रेस्टॉरंट्सचं रूप, पाहा PHOTO

भारतात सध्या हायड्रोक्सिक्लोरोक्वीन (hydroxychloroquine)आणि रेमडेसिवीर या दोन्ही औषधांचं कोरोनावर उपचारासाठी ट्रायल सुरू आहे. या दोन्ही औषधांच्या ट्रायलमध्ये चांगले परिणाम दिसून आले आहेत. मात्र हायड्रोक्सिक्लोरोक्वीन हे औषध जर कोरोनाविरोधी उपचारासाठी उत्तम पर्याय ठरलं, तर यासारखं दुसरा उपचारच नाही, असं भारतातील तज्ज्ञ डॉ. शीला गोडबोले म्हणाल्यात. डॉ. शीला गोडबोले या जागतिक आरोग्य संघटनेमार्फत जागतिक स्तरावर केल्या जाणाऱ्या चाचण्यांमध्ये भारताच्या समन्वियका म्हणून कार्यरत आहेत.

आता बारमध्ये गेलात तर गर्ल्स नाही 'रोबोट' बनविणार तुमचं कॉकटेल!

जागतिक आरोग्य संगघटनेनं आठवडाभरापूर्वीच हायड्रोक्सिक्लोरोक्विन औषधाचं ट्रायल थांबवलं होतं. या औषधाचं ट्रायल पुन्हा सुरू करणार असल्याची घोषणा बुधवारी WHO ने केली. जर हे औषध उपचार म्हणून प्रभावी ठरलं तर यासारखं दुसरं औषध नाही, असं भारतीय तज्ज्ञ म्हणालेत.

 

 

First published: June 4, 2020, 9:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading