मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

लॉकडाऊनदरम्यान पुण्यातील गणेश मंडळांचा लहानग्यांसाठी पुढाकार, एका फोनवर घरपोच देतायेत मोफत पुस्तकं

लॉकडाऊनदरम्यान पुण्यातील गणेश मंडळांचा लहानग्यांसाठी पुढाकार, एका फोनवर घरपोच देतायेत मोफत पुस्तकं

पुण्यातील पीयूष शहा या गणेशोत्सवातील कार्यकर्त्याने इतर गणेश मंडळातील कार्यकर्त्यांच्या मदतीनं 5000 पुस्तके विकत घेऊन ती मुलांना मोफत घरपोच (Free Books for Childrens in Pune) देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

पुणे 06 मे : कोरोना (Coronavirus) आणि लॉकडाऊनचा (Lockdown) मोठा फटका चिमुकल्यांना बसला आहे. शाळा बंद आहेत, मैदानं खुली नाहीत तर बागाही उघडलेल्या नाहीत. अशा परिस्थितीत मोबाईल, टिव्हीमुळे स्क्रीन टाईमही वाढला आहे. ग्रंथालये आणि पुस्तकाची दुकानंही बंद असल्याने वाचन ही थांबलं आहे. मात्र, पुण्यातील पीयूष शहा या गणेशोत्सवातील कार्यकर्त्याने इतर गणेश मंडळातील कार्यकर्त्यांच्या मदतीनं 5000 पुस्तके विकत घेऊन ती मुलांना मोफत घरपोच (Free Books for Childrens in Pune) देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी ठरणार अधिक घातक; तज्ज्ञांनी सांगितलं कारण

एप्रिल-मे महिना म्हणजे उन्हाळी सुट्ट्या मात्र एका वर्षभराहून अधिक काळ शाळा बंद राहिल्याने सुट्ट्यांचं अप्रूप मुलांना राहिलेलं नाही. शाळेचा प्रत्यक्ष अनुभव नाही, ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा यामुळं वाचन लिखाण कौशल्ये मंदावली आहेत . स्क्रीन टाईम वाढला आहे. याचा विचार करून पुण्यातील गणेश मंडळांचे कार्यकर्ते एकत्र आले. जय गणेश व्यासपीतठांतर्गत त्यांनी 4 ते 14 वयोगटातील मुलांसाठी चला मुलांनो पुस्तक वाचूया उपक्रमाला सुरुवात केली. 5000 पुस्तके विकत घेण्यात आली. अप्पा बळवंत चौकातील नूमवी शाळेत ही पुस्तके ठेवण्यात आली आहेत. शहराच्या कोणत्याही कोपऱ्यातून फोन आला की कार्यकर्ते दुचाकीवर पुस्तके घेऊन संबंधित मुला-मुलीच्या घरी जाऊन पुस्तके पोहोच करत आहेत, असं पीयूष शहा म्हणाले. कुंदन, अमित, नितीन यासारखे सुमारे 16 गणेश मंडळांचे कार्यकर्ते शहराच्या विविध भागात कार्यरत आहेत.

माणसातला देव! रुग्णांच्या मदतीसाठी धावले आमदार, जमीनीवरच झोपलेला Photo Viral

पालकांनी व्यक्त केलं समाधान -

आवडतं पुस्तक मिळाल्यामुळे मुलांची सुट्टी सत्कारणी लागत आहे. पालकही समाधानी आहेत. अवधूत साठे या मुलाने छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चरित्रात्मक पुस्तके वाचायला आवडली असल्याचं सांगितलं, तर मनोज्ञा करंबेळकर या विद्यार्थिनीने सस्पेन्स कथा आवडल्याचं सांगितलं. वृषाली साठे या पालकांनी या उपक्रमाचे कौतुक केलं आहे. मोबाईल आणि tv मुळे वाढलेला स्क्रीन टाईम पुस्तकांमुळे कमी होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

First published:

Tags: Coronavirus, Lockdown, Pune, Pune-book-gudhi