जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / माणसातला देव! कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले आमदार, जमीनीवरच झोपलेला Photo Viral

माणसातला देव! कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले आमदार, जमीनीवरच झोपलेला Photo Viral

माणसातला देव! कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले आमदार, जमीनीवरच झोपलेला Photo Viral

लंके यांनी आधी कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी 1 हजार बेडचं कोविड सेंटर (Covid Center) उभारलं. इतकंच नाही तर आता ते व्हायरल झालेल्या एका फोटोमुळे (Viral Photo of Nilesh Lanke) पुन्हा चर्चेत आले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 06 मे : देशात कोरोनाचा प्रसार झपाट्यानं वाढत आहे. विशेषतः महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण (Corona Cases in Maharashtra) आढळत असल्याचं चित्र आहे. या परिस्थितीमध्ये आरोग्य सुविधांचाही मोठा अभाव जाणवत आहे. इंजेक्शन आणि बेडसाठी रुग्णाच्या नातेवाईकांना अनेक प्रयत्न करावे लागत आहेत. या काळात अनेक राजकीय नेते सामान्य जनतेच्या मदतीसाठी पुढे सरसावत आहेत. यातीलच एक नाव आहे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांचं. लंके यांनी आधी कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी 1 हजार बेडचं कोविड सेंटर (Covid Center) उभारलं. इतकंच नाही तर आता ते व्हायरल झालेल्या एका फोटोमुळे (Viral Photo of Nilesh Lanke) पुन्हा चर्चेत आले आहेत. या कठीण काळात कोरोना रुग्णांना बेड मिळावा यासाठी अनेक प्रयत्न करावे लागत आहेत. अशा परिस्थितीमध्ये लंके यांनी दोन ठिकाणी एक हजार बेड्सचे कोविड सेंटर उभारले. फक्त सेंटर उभारुन ते थांबले नाहीत, तर रुग्णांच्या जेवणाची, उपचाराची आणि इतरही सर्व सुविधा त्यांनी याठिकाणी उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यांच्या या कामाची दखल शरद पवारांनीदेखील घेतली होती. याच कारणामुळे लंके आधीच चर्चेत असताना आता पुन्हा एकदा ते चर्चेचा विषय ठरत आहेत. यावेळी कारण आहे लंके यांचा व्हायरल झालेला एक फोटो. रुग्णांसाठी बेड उपलब्ध करुन देत लंके थांबले नाहीत. तर, रुग्णांची काळजी घेता यावी म्हणून त्यांनी कोविड सेंटरमध्येच मुक्काम ठोकला. हाच फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये लंके अंगावर घेण्यासाठी चादर आणि डोक्याखाली घेण्यासाठी उशी नसतानाही सामान्य नागरिकांसोबत जमीनीवर झोपल्याचं पाहायला मिळत आहे. कोणताही मोठेपणाचा आव न आणता ते शांतपणे झोपल्याचं यात दिसत आहे. हा फोटो राष्ट्रवादी काँग्रेस अपडेट या फेसबुक पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. या कठीण काळात सामान्य जनतेसोबत राहून त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी लंके यांनी घेतलेला हा पुढाकार नक्कीच कौतुकास्पद आहे. याच कारणामुळे लंके पुन्हा एकदा चर्चेत आले असून त्यांच्या या कामाचं कौतुक होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात