Home /News /coronavirus-latest-news /

COVID-19 3rd Wave: कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी ठरणार अधिक घातक; तज्ज्ञांनी सांगितलं कारण

COVID-19 3rd Wave: कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी ठरणार अधिक घातक; तज्ज्ञांनी सांगितलं कारण

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण देश चिंतेत असतानाच आता शास्त्रज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेची (COVID-19 Third Wave) शक्यता वर्तवली आहे. शास्त्रज्ञांच्या मते, कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी अधिक घातक ठरू शकते.

    नवी दिल्ली, 06 मे : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं (Coronavirus Second Wave) अक्षरशः थैमान घातलं आहे. दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत (Corona Infected Patients) मोठी वाढ होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण देश चिंतेत असतानाच आता शास्त्रज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेची (COVID-19 Third Wave) शक्यता वर्तवली आहे. शास्त्रज्ञांच्या मते, कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी अधिक घातक ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, कोरोनाची पहिली लाट वृद्धांसाठी घातक ठरली होती. दुसऱ्या लाटेचा परिणाम तरुणांवर सर्वाधिक झाला. अशा स्थितीमध्ये कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक ठरेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सप्टेंबरपर्यंत देशात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, बालरोग व संसर्गजन्य रोगांचे तज्ञ म्हणतात की कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता पाहाता लहान मुलांच्या लसीकरण कार्यक्रमालाही सुरुवात केली पाहिजे. सरकारने या संदर्भात कोणतीही त्वरित पावले उचलली नाहीत तर कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी प्राणघातक ठरू शकते. संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. नितीन शिंदे म्हणाले, कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती वर्तवली जात आहे, अशात लहान मुलांना लस न दिल्यास धोका आणखी वाढू शकतो. यावेळी कोरोनापासून बचाव करण्यासाठी लस सर्वात मोठं शस्त्र मानली जात आहे. तज्ज्ञांनी सांगितलं, की कोरोना संसर्गामुळे भलेही सध्या मुलांमध्ये कोणतीही गंभीर समस्या उद्भवली नाही, तरीही कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये मुलांचं आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेमध्ये मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये लहान मुलं मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या विळख्यात आली आहेत. अशात तिसरी लाट आल्यास, ही लाट सर्वाधिक घातक लहान मुलांसाठीच ठरेल. अशात आता लहान मुलांनाही लवकरात लवकर लस देण्याची गरज आहे. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणादरम्यान सरकारचे गणित मॉडेलिंग तज्ज्ञ प्रोफेसर एम. विद्यासागर म्हणतात, की कोरोनाची दुसरी लाट 7 मे रोजी शिगेला जाऊ शकते. यासाठी देशाच्या आरोग्य क्षेत्रानं पूर्णपणे तयार राहाणं गरजेचं आहे. प्रो. विद्यासागर म्हणाले, की या आठवड्यात कोरोना शिगेला पोहोचू शकतो. यानंतर रुग्णसंख्येत घट होताना पाहायला मिळेल. प्रत्येक राज्यात कोरोना सर्वोच्च बिंदूवर पोहोचण्याची वेळ वेगवेगळीही असू शकते.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Corona updates, Corona virus in india, Coronavirus

    पुढील बातम्या