मराठी बातम्या /बातम्या /पुणे /'शिवभक्त म्हणून या निर्बंधांमुळे माझाही हिरमोड झाला पण...', अमोल कोल्हेनी व्यक्त केली भावना

'शिवभक्त म्हणून या निर्बंधांमुळे माझाही हिरमोड झाला पण...', अमोल कोल्हेनी व्यक्त केली भावना

आज देशभरात 391वी शिवजयंती साजरी केली जात आहे. दरम्यान राज्यात कोरोनाचे सावट असल्यामुळे काही मर्यादा आणि नियमांचे पालन करत शिवजयंती साजरी करावी लागत असल्याने अनेक शिवभक्तांचा हिरमोड झाला आहे

आज देशभरात 391वी शिवजयंती साजरी केली जात आहे. दरम्यान राज्यात कोरोनाचे सावट असल्यामुळे काही मर्यादा आणि नियमांचे पालन करत शिवजयंती साजरी करावी लागत असल्याने अनेक शिवभक्तांचा हिरमोड झाला आहे

आज देशभरात 391वी शिवजयंती साजरी केली जात आहे. दरम्यान राज्यात कोरोनाचे सावट असल्यामुळे काही मर्यादा आणि नियमांचे पालन करत शिवजयंती साजरी करावी लागत असल्याने अनेक शिवभक्तांचा हिरमोड झाला आहे

पुणे, 19 फेब्रुवारी: आज देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांची 391वी जयंती थाटामाटात पण त्याचबरोबर कोरोनाच्या सर्व गाइडलाइन्सचं पालन करत साजरी केली जात आहे. किल्ले शिवनेरीवर देखील शिवजयंतीचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवजयंती साजरी करण्यावर काही निर्बंध राज्य सरकारने आखून दिले होते, त्यामुळे अनेक शिवभक्तांनी नाराजी व्यक्त केली होती. शिवनेरीवर शिवजन्म सोहळ्याला केवळ 100 जणांना उपस्थित राहता येईल, या निर्णयामुळे सरकारचा निषेधही करण्यात आला. दरम्यान शिवजयंती साजरी करण्यावर आखलेल्या निर्बंधांवर खासदार अमोल कोल्हे यांनी देखील त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

शिवनेरीवर आयोजित सोहळ्यात अमोल कोल्हे असं म्हणाले की, शिवभक्त म्हणून माझी सुद्धा भावना आहे की हे जे निर्बंध घातलेत त्यामुळे माझाही हिरमोड झाला आहे. आपण दोन पावलं मागे आलो असलो तरी पुढच्या वर्षी जोरात शिवजयंती साजरी करू. कोरोनाचे नियम पाळूनच आपण शिवजयंती साजरी करू.'

दरम्यान दुसरीकडे रायगडावर शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून विद्युत रोषणाई करण्यात आली. मात्र ही विद्युत रोषणाई करताना डिस्को लाइट वापरले गेल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर डॉ. अमोल कोल्हेंनी काहीशी सावध प्रतिक्रिया दिली. त्यांनी असे म्हटले की, 'जे घडलं त्याबाबत मला जास्त माहिती नाही आहे पण माध्यमांमधून वाचनात आलं आहे. रायगडाचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे'. याप्रकरणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी संताप व्यक्त केला होता. रायगडाला अशा प्रकारची डिस्को लाइट लावणे म्हणजे ऐतिहासिक ठिकाणाचा अपमान असल्याची टीका संभाजीराजेंनी केली आहे.

(हे वाचा-गलवान खोऱ्यातील चकमकीत आमचे 5 जवान मारले गेले, अखेर चीनने केलं मान्य)

शिवजयंती साजरी करण्याबाबत बोलायचे झाले तर, यावर्षी शाश्वत शिवजयंती साजरी करण्याचा डॉ. अमोल कोल्हे यांचा मानस आहे. आज महाराजांच्या 391व्या शिवजयंतीनिमित्त 391 झाडं लावण्याचा उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे. त्यांनी वनउपविभाग, जुन्नर आणि पुरातत्व विभागाच्या सहकार्याने शिवनेरीवर 391 झाडं लावण्याचा निश्चय केला आहे. हेच आवाहन त्यांनी महाराष्ट्रातील इतर गावांना देखील केले आहे. ही झाडं लावून ती जगवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

First published:
top videos

    Tags: BJP, Maharashtra, Modi government, PM narendra modi, Pune, Shivsena