पुणे, 27 मे : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा मतदारसंघ रिक्त झाला आहे. या जागेवर निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाच्या हालचालींना वेग आला आहे. मात्र या पोटनिवडणुकीवरून पुन्हा एकदा आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला जात असतानाही वारंवार राष्ट्रवादीकडून या मतदारसंघावर दावा करण्यात येत आहे. यावरून आता काँग्रेसनं देखील राष्ट्रवादीला चांगलंच सुनावलं आहे. राष्ट्रवादीचा दावा पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीमध्ये ही जागा काँग्रेसच्या वाट्याला जाते. मात्र या जागेवर राष्ट्रवादीकडून देखील दावा करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केलेल्या दाव्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील दावा केला आहे. अजित पवार यांच्या दाव्यानंतर काँग्रेस चांगलंच आक्रमक झालं आहे. काँग्रेसनं आपली भूमिका मांडताना राष्ट्रवादीला सुनावलं आहे. बच्चू कडूंच्या नव्या खेळीमुळे भाजप, शिवसेना अडचणीत; राणांचंही टेन्शन वाढलं काँग्रेसची भूमिका ही जागा काँग्रेसची आहे, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये काँग्रेसच ही जागा लढवणार असल्याचं काँग्रेस नेते मोहन जोशी यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की भाजपला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये एक्य राहणं गरजेचं आहे, आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







