मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /बच्चू कडूंच्या नव्या खेळीमुळे भाजप, शिवसेना अडचणीत; राणांचंही टेन्शन वाढलं

बच्चू कडूंच्या नव्या खेळीमुळे भाजप, शिवसेना अडचणीत; राणांचंही टेन्शन वाढलं

बच्चू कडू यांचा अमरावती मतदारसंघावर दावा

बच्चू कडू यांचा अमरावती मतदारसंघावर दावा

बच्चू कडू यांनी केलेल्या दाव्यामुळे शिंदे गट आणि भाजपमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Amravati, India

अमरावती, 27 मे : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटाचे समर्थक आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यामध्ये वाद सुरू आहे. पुन्हा एकदा बच्चू कडू आणि रवी राणा आमने-सामने आले आहेत. बच्चू कडू यांच्याकडून अमरावती लोकसभा मतदार संघावर दावा करण्यात आला आहे. बच्चू कडू यांच्या दाव्यानंतर रवी राणा देखील आक्रमक झाले आहेत. अमरावतीमधून 2024 ची लोकसभा निवडणूक नवनीत राणा याच लढवणार आहेत. जे आज दावा करत आहेत ते उद्या प्रचार करतील असा टोला राणा यांनी बच्चू कडूंना लगावला आहे.

भाजप, शिंदे गटात तणावाची शक्यता

शिवसेना शिंदे गटचे समर्थक आमदार बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभा मतदार संघावर दावा केला आहे. मात्र हा मतदारसंघ नवनीत राणा यांचा आहे. नवनीत राणा या भाजपच्या निकटवर्तीय आहेत. त्यामुळे या मतदारसंघावरून शिंदे गट आणि भाजपात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. बच्चू कडू यांनी देखील या जागेवर दावा केल्यानं ही जागा आता कोणाला मिळणार  हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

रवी राणांनाचा टोला

परंतु दुसरीकडे  बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांनी अमरावतीच्या जागेवर खासदार नवनीत राणा याच भाजप व शिंदे गटाकडून निवडणूक लढतील, जे दावे प्रती दावे करतात ते प्रचार करतील असा टोला लगावला आहे. रवी राणा यांच्या या दाव्यानंतर आता बच्चू कडू काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे.

First published:
top videos