Home /News /pune /

चौथ्या वर्षी कादंबरी, सातव्या वर्षी जगभरात भाषणं... बांग्लादेशी स्थलांतरित छोट्या सोबोर्नोचा VIDEO पाहून थक्क व्हाल

चौथ्या वर्षी कादंबरी, सातव्या वर्षी जगभरात भाषणं... बांग्लादेशी स्थलांतरित छोट्या सोबोर्नोचा VIDEO पाहून थक्क व्हाल

7 वर्षांचा चिमुरडा जागतिक शांतता या विषयावर फर्ड्या इंग्रजीत पुण्यात भाषण देत होता, तेव्हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जमलेल्या लोकांच्या चेहऱ्यावरचं कौतुकमिश्रित आश्चर्य लपत नव्हतं. चौथ्या वर्षीच पुस्तक लिहिणारा हा पठ्ठा जगातला सर्वात लहान कादंबरीकार आहे.

पुढे वाचा ...
पुणे, 6 जानेवारी : बांगलादेशातून अमेरिकेत स्थलांतरित झालेला हा 7 वर्षांचा चिमुरडा जागतिक शांतता या विषयावर फर्ड्या इंग्रजीत भाषण देत होता, तेव्हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जमलेल्या लोकांच्या चेहऱ्यावरचं कौतुकमिश्रित आश्चर्य लपत नव्हतं. 2012 साली जन्मलेला हा पठ्ठा जगातला सर्वात लहान वयाचा (child prodigy) कादंबरीकार (youngest noveslist) आहे. सोबोर्नो आयझॅक बारीच्या (Soborno Isaac Bari) फर्ड्या भाषणाची झलक पाहण्यासाठी स्क्रोल करून खाली VIDEO पाहा... पण त्याची गोष्टही त्याआधी वाचा, तीही तितकीच वेधक आहे. 'बाळाचे पाय पाळण्यात दिसतात' असं म्हणतात, पण त्याचा शब्दशः प्रत्यय सोबोर्नोच्या आई वडिलांशी बोलताना येतो. वर्षाचं होईपर्यंत मूल बोबडं बोल बोलू लागतं त्याचं आई-वडिलांना कोण कौतुक असतं. पण हा सोबर्णो (या बंगाली नावाचा अर्थ सोनं, सुवर्णासारखा सुंदर, Beautiful as gold असं त्याचे वडील सांगतात.)6 महिन्यांचा असताना घडाघडा बोलू लागला होता. सोबोर्नोचे वडील रशीद उल आणि आई शाहिदा सांगतात की अगदी लहान वयातच तो आकडेमोड करायला लागला होता. गणित, भौतिकशास्र या विषयातली अवघड गणितंही तो काही वर्षांपूर्वीच सोडवू लागला आहे. वयाच्या चौथ्या वर्षी त्याने 'द love' ही कादंबरी लिहिली. तो जगातला सर्वात कमी वयाचा कादंबरीकार ठरला. त्याचं कौतुक अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनीही केलं आहे. तसं पत्र त्यांनी लिहिल्याचं सोबोर्नोचे पालक सांगतात. त्याची प्रज्ञा, प्रतिभा, बुद्धिमत्ता बघून त्याला सध्याच्या काळातील आयझॅक न्यूटन म्हटलं गेलं. त्याच्या नावातही आयझॅकचा समावेश केला गेला. सोबोर्नो आयझॅक बारी सध्या 7 वर्षांचा आहे. त्याला बुद्धिबळ आवडतं आणि मोठेपणी भौतिकशास्त्राचा शिक्षक व्हायचं आहे, असं तो सांगतो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात त्याने जागतिक शांतता या विषयावर अर्धा तास न घाबरता भाषण ठोकलं, तेव्हा जमलेले सगळेच त्याच्या कौशल्यावर आणि बुद्धिमत्तेवर भारावून गेले होते. सोबोर्नोरूपी हा चमत्कार पाहायला आणि अनुभवायला पुणे विद्यापीठाच्या पर्यावरण विभागात त्याचं भाषण ऐकायला दर्दी लोकांनी गर्दी केली होती. 'नमस्कार'  म्हणून सुरुवात करत भारताचं राष्ट्रगीत - 'जन गण मन' गायलं. त्यानं आपलं अर्ध्या तासाचं भाषण संपवलं तेव्हा सर्व जण अवाक झाले होते. ---------------------------------------- अन्य बातम्या फडणवीस सरकारला जमलं नाही ते ठाकरे करून दाखवणार, मराठी भाषेवर मोठा निर्णय भाजपला बसणार का आणखी एक दणका? असा आहे केजरीवालांच्या दिल्लीचा कौल घरात ठेवलेल्या सोन्यावर आहे बँकांची नजर, मोदी सरकारचे नवे आदेश Google Pay, Paytm वरून पेमेंट करताना काळजी घ्या, होऊ शकते फसवणूक
Published by:अरुंधती रानडे जोशी
First published:

पुढील बातम्या