मराठी बातम्या /बातम्या /देश /

DELHI Opinion Poll : भाजपला बसणार का आणखी एक दणका? असा आहे केजरीवालांच्या दिल्लीचा कौल

DELHI Opinion Poll : भाजपला बसणार का आणखी एक दणका? असा आहे केजरीवालांच्या दिल्लीचा कौल

दिल्लीत बुधवारी 8 फेब्रुवारीला मतदान होईल आणि मतमोजणी मंगळवार- 11 फेब्रुवारीला होईल. सोमवार 6 जानेवारीपासूनच आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

दिल्लीत बुधवारी 8 फेब्रुवारीला मतदान होईल आणि मतमोजणी मंगळवार- 11 फेब्रुवारीला होईल. सोमवार 6 जानेवारीपासूनच आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

दिल्लीत बुधवारी 8 फेब्रुवारीला मतदान होईल आणि मतमोजणी मंगळवार- 11 फेब्रुवारीला होईल. सोमवार 6 जानेवारीपासूनच आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

  • Published by:  Manoj Khandekar

नवी दिल्ली, 6 जानेवारी : दिल्ली विधानसभा निवडणुकीची (Delhi Assembly Polls) तारीख निवडणूक आयोगाने सोमवारी जाहीर केली. या छोट्या पण सर्वात महत्त्वाच्या राज्यात 8 फेब्रुवारीला मतदान होणार आहे आणि दिल्लीची सत्ता (Delhi Election) कुणाला मिळणार हे 11 फेब्रुवारीला स्पष्ट होईल. मतदारांचा कौल कुठल्या दिशेला आहे हे चाचपण्यासाठी CVoter ने केलेल्या जनमत चाचणीत (Opinion Poll )भाजपच्या हातून हे राज्यही जाणार असं चित्र आहे.

2015 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत 70 पैकी 67 जागा मिळवून आम आदमी पक्षाने मोठा विजय मिळवला होता. आता अरविंद केजरीवाल दिल्लीची सत्ता टिकवणार का हा प्रश्न आहे. जनमत चाचणीत केजरीवालांच्या बाजूने निकाल लागणार असं चित्र दिसलं सी वोटरच्या या ओपिनियन पोलमध्ये 'आप'ला 59 जागा मिळतील तर भाजपला 8 जागांवर समाधान मानावं लागेल, असा अंदाज आहे. काँग्रेसची बोळवण 3 जागांवर होईल, असं हा पोल सांगतो.

मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून अरविंद केजरीवाल यांच्या नावाला 69.50 टक्के दिल्लीकरांनी पसंती दिली आहे. दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे खासदार आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या नावाला (10.7 टक्के लोकांनी)पसंती मिळाली आहे. मनीष सिसोदिया (2.2 टक्के)आणि भाजपचे विजय गोयल (1.1टक्के)यांची नावंही काही लोकांनी मुख्यमंत्रिपदासाठी योग्य असल्याचं म्हटलं आहे.

आपला 53 टक्के वोटशेअर मिळेल, तर भाजपला 26 टक्के मतं मिळतील असा अंदाज या पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.

भाजपने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा अद्याप दिलेला नाही. आपने केजरीवाल यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याचं ठरवं आहे. भाजपचे स्टार कँपेनर पंतप्रधान नरेंद्र मोदीच असतील, असं चित्र आहे. दिल्लीत मुख्यमंत्री म्हणून केजरीवाल यांना लोकांची पसंती असली, तरी पंतप्रधान म्हणून दिल्लीकरांची अजूनही मोदींना पसंती आहे, असं ही जनमत चाचणी सांगते.

63.3. टक्के लोकांनी पंतप्रधानपदी मोदीच असायला हवेत, असं सांगितलं. 34 टक्के दिल्लीकरांनी मात्र पंतप्रधान बदलला पाहिजे, असं मत व्यक्त केलं.

8 फेब्रुवारीला मतदान

राजधानी दिल्ली काबीज करण्यासाठी राजकीय युद्ध लवकरच सुरू होणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली. दिल्लीत बुधवारी 8 फेब्रुवारीला मतदान होईल आणि मतमोजणी मंगळवार- 11 फेब्रुवारीला होईल. सोमवार 6 जानेवारीपासूनच आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

विधानसभेची निवडणूक एकाच टप्प्यात होईल. या दिवशी मतदान होईल तर रोजी मतमोजणी होऊन निकाल लागेल.

काँग्रेसला सोडून शिवसेनेनं हाती घेतलं कमळ, या जिल्ह्यात दिला भाजपला पाठिंबा

सध्याच्या दिल्ली विधानसभेची मुदत 22 फेब्रुवारीला संपत आहे. त्याच्या आधी दिल्लीमध्ये नवं राज्य सरकार स्थापन होणं आवश्यक आहे. 70 सदस्यांच्या दिल्ली विधानसभेत 36 जागा मिळवणाऱ्या पक्षाला बहुमत मिळेल. दिल्लीतल्या मतदारांची संख्या आता 1,46,92,136 इतकी झाली आहे.

'अच्छे बीते 5 साल. लगे रहो केजरीवाल'

'आप'ला 2015 मध्ये झालेल्या गेल्या निवडणुकीत 70 पैकी 67 जागा मिळाल्या होत्या. भाजप आणि काँग्रेसला पर्याय म्हणून अरविंद केजरीवाल यांनी प्रचंड बहुमत दिलं होतं. या वेळी 70 जागा जिंकून इतिहास घडवण्याचं आपचं स्वप्न आहे. त्यांनी गेल्या महिन्यात प्रचारालाही सुरुवात केली आहे. 'अच्छे बीते 5 साल. लगे रहो केजरीवाल' अशी त्यांची या वेळच्या प्रचारमोहीमेची लाइनही ठरलेली आहे.

भाजपसाठी स्टार कँपेनर म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच चेहरा आहे. रामलीला मैदानावर गेल्या महिन्यात सभा घेऊन भाजपनेही प्रचाराचा नारळ फोडला आहे. भाजपसाठी NRC, CAA आणि राष्ट्रवाद हे प्रचाराचे मोठे मुद्दे ठरतील. तर 'आम' सामान्यांना जिव्हाळा असणारे - वीज, पाणी, प्रदूषण प्रश्न प्राधान्याने प्रचार मोहिमेत घेईल अशी शक्यता आहे.

अन्य बातम्या

JNU: धक्कादायक खुलासा, हिंसाचारावेळी हल्लेखोरांनी वापरला कोडवर्ड

ट्रम्प यांच्या शिरच्छेदासाठी 576 कोटींचे बक्षिस, सुलेमानीच्या हत्येचा घेणार बदला

'वंदे मातरम्'च्या जयघोषाने दुमदुमलं स्टेडियम, अभिमान वाटावा असा VIDEO

'ठाकरे आडनाव आहे म्हणून थोडीफार किंमत आहे, नाहीतर...', शिवसेना नेत्याचा घणाघात

First published:

Tags: Delhi assembly election 2019