मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

...म्हणून प्रेयसीचं हात-पाय अन् मुंडकं केलं धडावेगळं; पुण्याला हादरवणारी घटना

...म्हणून प्रेयसीचं हात-पाय अन् मुंडकं केलं धडावेगळं; पुण्याला हादरवणारी घटना

(प्रातिनिधीक फोटो)

(प्रातिनिधीक फोटो)

Murder in Pune: पुण्यातील बुधवार पेठ परिसरात राहणाऱ्या एका युवकानं आपल्या प्रेयसीची गळा आवळून निर्घृण हत्या (Girlfriend's Murder by Strangulation) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

  • Published by:  News18 Desk

पुणे, 25 ऑगस्ट: पुण्यातील (Pune) बुधवार पेठ (Budhwar Peth) परिसरात राहणाऱ्या एका युवकानं आपल्या प्रेयसीची गळा आवळून निर्घृण हत्या (Girlfriend's Murder by Strangulation) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीनं प्रेयसीची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे (dead body cut into pieces) पिशवीत भरुन लवासा परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी फेकले आहेत. घटनेच्या 12 दिवसांनंतर पोलिसांनी हत्येचा उलगडा केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृत महिलेच्या प्रियकराला अटक (Boyfriend arrested) केली असून त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आहे.

रोझिना रियाझ पानसरे ऊर्फ कविता चौधरी असं हत्या करण्यात आलेल्या 31 वर्षीय तरुणीचं नाव असून ती पुण्यातील बुधवार पेठ परिसरात वास्तव्याला आहे. तर हनुमंत शिंदे असं अटक करण्यात आलेल्या आरोपी प्रियकराचं नाव आहे. संबंधित आरोपी हा विवाहित असून आपल्या कुटुंबीयांसोबत बुधवार पेठ परिसरात वास्तव्याला आहे. याठिकाणीच त्याचा मोबाइल दुरुस्ती करण्याचा छोटाशा व्यवसाय आहे.

हेही वाचा-भाजपच्या युवा नेत्याची आत्महत्या, प्रेमात धोका मिळाल्याचं कारण आलं समोर

नेमकं प्रकरण काय आहे?

काही दिवसांपूर्वी आरोपी हनुमंत यानं मृत रोझिना यांना राहण्यासाठी एक भाड्यानं खोली मिळवून दिली होती. यातूनच दोघांत पहिल्यांदा ओळख झाली होती. यानंतर त्यांच्या ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं आणि पुढे दोघांत प्रेम संबंधालाही सुरुवात झाली. आरोपी हनुमंत अधुनमधून रोझिनाकडे नेहमी जायचा. पण विवाहित असल्यानं रात्री झोपायला हनुमंत आपल्या घरी जायचा. पण रोझिनाला ही बाब खटकत होती. त्यामुळे तिने हनुमंतनं आपल्यासोबतच राहावं असा हट्ट धरला. यासाठी रोझिनानं हनुमंतला शिवीगाळ करत छळ करायला सुरुवात केली. हा प्रकार बरेच दिवस सुरू होता.

हेही वाचा-नववीच्या विद्यार्थ्याची शाळेतच हत्या, प्रेमप्रकरणातून दोघांनी चाकूने भोसकले

दिव्य मराठीनं दिलेल्या वृत्तानुसार, 12 ऑगस्ट रोजी देखील दोघांत याचं कारणावरून वाद झाला. रोझिना हिने यादिवशी हनुमंतला शिवीगाळ केली. त्यामुळे संतापलेल्या हनुमंतनं रोझिनाचा गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर तो घराला कुलूप लावून अक्कलकोटला निघून गेला. त्यानंतर 14 ऑगस्ट रोजी रात्री आपल्या मित्राचा चारचाकी टेम्पो घेऊन तो रोझिनाच्या घरी गेला. याठिकाणी आरोपीनं रोझिनाच्या मृतदेहाचे तुकडे केले. तिचं मुंडकं आणि हात-पाय धडावेगळं केलं. सर्व तुकडे ताडपत्रीच्या पिशवीत भरून हे तुकडे भूगाव ते लवासा घाट परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले.

हेही वाचा-चिकन फ्राय बनवले नाही म्हणून केला बायकोचा खून, रागाच्या भरात केले डोक्यात वार

दुसरीकडे, मागील 10-12 दिवसांपासून रोझिना बेपत्ता असल्याची तक्रार फरसखाना पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. यानंतर हनुमंतचे रोझिनासोबत अनैतिक संबंध असल्याची  माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी हनुमंतला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. यानंतर पोलिसांनी प्रश्नांचा भडीमार केला असता, हनुमंतनं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Murder, Pune