रायपूर, 24 ऑगस्ट : शाळेच्या मधल्या सुट्टीत (school recession) वर्गातून बाहेर आलेल्या नववीच्या विद्यार्थ्यावर (student) दोन अज्ञातांनी (unknown) चाकूचे वार (stabbed) केल्यामुळे या विद्यार्थ्याचा मृत्यू (death) झाला आहे. मधल्या सुट्टीत नेहमीप्रमाणे मैदानात आलेल्या या विद्यार्थ्याला काही कळण्यापूर्वीच त्याच्या छातीत चाकूचे वार करण्यात आले. त्यानंतर मुलाने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र घाव वर्मी लागल्यामुळे तो खाली कोसळला.
अशी घडली घटना
ही घटना आहे छत्तीसगडमधल्या रायगढची. सागर टंडन या विद्यार्थी त्याच्या घराजवळच असणाऱ्या शाळेत नवव्या इयत्तेत शिकत होता. शाळेची मधली सुट्टी झाल्यामुळे विद्यार्थी इतस्ततः पांगले होते. काहीजण डबा खात होते, काहीजण पाणी पित होते, तर काहीजण मैदानात खेळत होते. सागर नेहमीप्रमाणे मैदानात खेळण्यासाठी येत असतानाच समोरून आलेल्या दोन अल्पवयीन मुलांनी सागरवर हल्ला केला. दोघांनी चाकूने त्याच्या पोटात आणि छातीत वार केले.
या हल्ल्यामुळे रक्तबंबाळ झालेला सागर धावत धावत स्टाफरुमच्या दिशेने गेला. तिथे शिक्षण जेवण करत होते. शिक्षकांच्या समोर पोहोचलेला सागर तिथेच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. शिक्षकांना काही समजायच्या आतच तिथे विद्यार्थ्यांचा घोळका जमा झाला. सर्वांनी मिळून सागरला उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र रुग्णालयात त्याचा मृत्यू झाल्याचं जाहीर करण्यात आलं.
हल्लेखोरही अल्पवयीन
सागरवर हल्ला करणारे आरोपीदेखील अल्पवयीन असल्याचं समोर आलं आहे. हा हल्ला शाळेतील प्रेमप्रसंगावरून झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सागरच्या वरच्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलीचं हल्लेखोरासोबत प्रेमप्रकरण सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. सागरनं आपली छेड काढल्याची तक्रार या मुलीनं हल्लेखोराकडं केली होती. त्यानंतर हल्लेखोर आणि सागरमध्ये बाचाबाचीही झाली होती. त्यावेळी हे प्रकऱण शांत झालं होतं. मात्र आता पुन्हा त्या हल्लेखोरांनी सागरवर चाकूनं वार करून त्याचा खून केला, अशी बातमी 'दैनिक भास्कर'ने दिली आहे.
हे वाचा -प्रियकरानं प्रेयसीसमोरच केली तिच्या आईची हत्या; मृतदेह सुटकेसमध्ये टाकला अन्...
दोघांपैकी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरु केला आहे. दुसऱ्या आरोपीला पकडल्यानंतरच या हल्ल्यामागचं खरं कारण स्पष्ट होईल, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chattisgarh, Crime, Murder, School student