बंगळुरू, 24 ऑगस्ट : पत्नीने चिकन फ्राय (Chicken fry) बनवले नाही, याचा राग आल्यामुळे पतीने (husband) स्वतःच्या पत्नीचा (wife) खून (murder) केल्याची घटना उघडकीला आली आहे. सकाळी जाताना रात्रीच्या जेवणात चिकन फ्राय करण्याची सूचना पतीने केली होती. मात्र रात्री घरी आल्यानंतर पत्नीने चिकन फ्राय केलेच नसल्याचे लक्षात आल्यामुळे पतीच्या रागाचा पारा चढला आणि त्याने पत्नीच्या डोक्यावर वार केले.
असे झाले भांडण
बंगळुरूमध्ये राहणारा मुबारक पाशा हा 30 वर्षांचा तरुण गाद्या आणि उशा विकण्याचा व्यवसाय करतो. त्याने त्याची पत्नी शिरीन बानू (वय 28) हिला रात्रीच्या जेवणात चिकन फ्राय करण्याची सूचना केली होती. दिवसभर काम करून तो जेव्हा घरी आला, तोच चिकन फ्राय खाण्याचे मनसुबे आखत. मात्र घरी पत्नीने ही डिश बनवलीच नसल्याचे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याचा रागाचा पारा चढला आणि त्याने पत्नीला बेदम मारहाण करायला सुरुवात केली. त्याने घरातील लाकडाने तिच्या डोक्यावरही काही वार केले. हे वार वर्मी लागल्याने पत्नीचा मृत्यू झाला.
पोलिसांचा शोध
आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार शिरीनच्या आईने नोंदवल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र पोलिसांना शिरीनचा काहीच पत्ता लागत नव्हता. शिरीनबाबतच्या चौकशीला मुबारक टाळत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. त्यानंतर पोलिसांनी जाणीवपूर्वक मुबारकला अधिक प्रश्न विचारायला सुरुवात केली. मात्र तरीही पोलिसांना शिरीनचा कुठलाही सुगावा लागत नव्हता.
हे वाचा -हॉटेलमध्ये महिलेचा गळा चिरला, वार झाल्यावर अर्ध्या तासात गेला जीव
मुबारकनेच दिली कबुली
अखेर मुबारकनेच पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या पत्नीचा आपणच खून केल्याची कबुली दिली. पत्नीचा मृत्यू झाला, त्यावेळी मुलं झोपली होती. त्यामुळे आपण बायकोचा मृतदेह घराजवळील तळ्यापाशी पुरुन टाकल्याचं त्यानं सांगितलं. आपल्याला राग अनावर झाल्याने अऩावधानाने पत्नीला मारहाण केली. मात्र तिचा खून करण्याचा आपला उद्देश नसल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी मुबारकवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.