मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

धक्कादायक! भाजपच्या युवा नेत्याची आत्महत्या, प्रेमात धोका मिळाल्याचं कारण आलं समोर

धक्कादायक! भाजपच्या युवा नेत्याची आत्महत्या, प्रेमात धोका मिळाल्याचं कारण आलं समोर

प्रेमात अपयश (failure in love affair) आल्यामुळे भाजयुमोच्या तरुण नेत्याने (BJP Leader) गळफास घेत (Hanged himself) आत्महत्या (suicide) केल्याची घटना घडली आहे.

  • Published by:  desk news

रायपूर, 24 ऑगस्ट : प्रेमात अपयश (failure in love affair) आल्यामुळे भाजयुमोच्या तरुण नेत्याने (BJP Leader) गळफास घेत (Hanged himself) आत्महत्या (suicide) केल्याची घटना घडली आहे. भाजपात सक्रीय असणाऱ्या या नेत्याने रात्रीच्या सुमाराला स्वतःचं आयुष्य संपवण्याचा निर्णय़ घेतला. त्याच्याकडे मिळालेल्या सुसाईट नोटमधून प्रेमप्रकरणात अपयश आल्यामुळेच त्याने हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट झालं आहे.

अशी घडली घटना

छत्तीसगडमधील (Chattisgarh)  दुर्ग (Durg) शहरात राहणारा गोपाल सिंग राजपुत हा तरुण राजकीय क्षेत्रात कार्यरत होता. भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून त्यानं नुकतंच आपलं राजकीय करिअर सुरु केलं होतं. गोपाल सिंग एका तरुणीच्या प्रेमातही पडला होता. मात्र या प्रेमप्रकरणात अपयश आल्यामुळे त्याने आत्महत्येचा निर्णय घेतल्याचं सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी गोपाल सिंह राजपूतनं आपल्या कुटुंबीयांसोबत रात्री एकत्र जेवण घेतलं. त्यांच्याशी गप्पा मारल्या. त्यानंतर रात्री तो आपल्या खोलीत झोपायला निघून गेला. सकाळी बराच वेळ तो दार उघडत नसल्यामुळे त्याच्या भावाने दरवाजा तोडला. आतील चित्र पाहून भावासह पूर्ण कुटुंबाला धक्का बसला. गोपाल सिंगनं स्वतःला फास लावून घेतला होता. फास लावण्यापूर्वी त्यानं स्वतःच्या मनगटाच्या नसादेखील कापल्या होत्या.

हे वाचा - हॉटेलमध्ये महिलेचा गळा चिरला, वार झाल्यावर अर्ध्या तासात गेला जीव

या घटनेशी माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी मृतदेह खाली उतरवून पोस्टमॉर्टेमसाठी पाठवून दिला आहे. गोपाल सिंगच्या पाकिटात त्यानं लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना सापडली. आपल्याला प्रेमात आलेलं अपयश सहन होत नसल्यामुळेच आपण आत्महत्या कऱण्याचा निर्णय घेत आहोत, असं त्यानं या चिठ्ठीत लिहिलं आहे. आपल्याला प्रेमात मिळालेल्या धोक्यामुळेच आपण आयुष्य संपवत असल्याचं त्यानं लिहिलं आहे. एका तरुण आणि उमद्या नेत्याचा असा अंत झाल्यामुळे कुटुंबात आणि समाजात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी या प्रकऱणी आत्महत्येचा गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे.

First published:

Tags: BJP, Chattisgarh, Suicide