• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • मियां बीवी राजी, घरचेही सहमत; लव्ह जिहादचा रंग देत पुण्यातील जोडप्याला बाहेरच्यांकडूनच धमक्या

मियां बीवी राजी, घरचेही सहमत; लव्ह जिहादचा रंग देत पुण्यातील जोडप्याला बाहेरच्यांकडूनच धमक्या

Crime in Pune: दोन्ही कुटुंबांच्या सहमतीनं सुरू असलेल्या एका हिंदू-मुस्लिम तरुण तरुणीच्या लग्नाला काही नेटकऱ्यांकडून सोशल मीडियात लव्ह जिहादचा रंग देण्यात येत आहे.

  • Share this:
पुणे, 11 जुलै: दोघांच्या घरच्यांच्या सहमतीनं एक मुस्लीम मुलगा (Muslim Boy) हिंदू मुलीसोबत (Hindu girl) लग्न (Marriage) करण्यासाठी न्यायालयात गेला होता. याबाबतची नोटीस फलकावर लावण्यात आली होती. अज्ञात व्यक्तीनं ही नोटीस सोशल मीडियावर व्हायरल (Social media viral) केली. यानंतर अनेकांनी संबंधित जोडप्याला धमक्या द्यायला सुरुवात केली आहे. पुण्यातील हे जोडपं उच्चशिक्षित असून दोघांच्या घरच्यांच्या सहमतीनं लग्न करण्यासाठी कोर्टात गेलं होतं. मात्र आता सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण या लग्नाला लव्ह जिहादचा (Love Jihad) रंग देत आहेत. अनेकजण सोशल मीडियावर ही नोटीस शेअर करत संबंधित जोडप्यानं लग्न करू नये असं आवाहन केलं जात आहे. अशाच प्रकारची एक घटना नाशिकमध्ये देखील घडली आहे. बाहेरील लोकांच्या विरोधामुळे संबंधित जोडप्याला आपलं लग्न रद्द करावं लागलं आहे. या प्रकरणी राईट टू लव्ह ही संस्था गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांकडे धाव घेणार आहे. या प्रकरणी ब्राह्मण महासंघ, मुस्लिम सत्यशोधक संघटना आणि राईट टू लव्ह या संघटनांनी विविध दावे आणि आरोप केले आहे. हेही वाचा-नागपुरच्या हत्याकांडाची पुनरावृत्ती; एक ब्रेकअप आणि तीन मर्डरचा थरार नाशिकमधील घटना नेमकी काय? नाशिकमध्ये हिंदु तरुणीचा आणि मुस्लिम तरुणाचा विवाह हा 18 जुलैला होणार होता. त्यासाठी दोन्ही कुटुंबियांकडून सगळी तयारी करण्यात आली होती. एका बड्या हॉटेलात हा लग्न सोहळा पार पडणार होता. मात्र लग्न पत्रिका व्हायरल झाल्यानंतर मुलीच्या घरच्यांना काही लोकांनी विरोध करायला सुरुवात केली. तर अनेकांनी फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली. अज्ञात लोकांकडून येणाऱ्या धमक्यांमुळे कुटुंबीयांवर लग्न रद्द करण्याची वेळ आली आहे. मुलगा मुस्लिम असल्यानं अनेकांकडून या लग्नाला विरोध होत आहे. हेही वाचा-8वीच्या मुलीकडे शरीरसुखाची विचारणा;बस वाहकाला मुंबई कोर्टानं सुनावली कठोर शिक्षा याप्रकरणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी विचारणा केली असता, त्यांनी म्हटलं की, 'नेमकं प्रकरण काय आहे, हे मला माहिती नाही. मात्र हा विवाह जर कायद्यानं होत असेल तर त्यावर धमक्या देणं चुकीचं आहे. तरीही धमक्या येत असतील तर मात्र कायद्यानं यामध्ये लक्ष घातलं पाहिजे.' यावेळी देवेंद्र फडणवीस नागपूरातील 'हिरोझ ऑफ नागपूर' या भित्तीचित्र उद्घाटन प्रसंगी बोलत होते. हेही वाचा-पॉर्न साईटवर टाकला पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचा फोटो; या नेत्याच्या मुलावर आरोप यावेळी फडणवीस यांनी योगी सरकारच्या लोकसंख्याबाबतच्या नवीन कायद्याचं समर्थन केलं आहे. जनसंख्येचा विस्फोट थांबवण्यासाठी अशा कायद्याची आवश्यकता असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. संपूर्ण देशात अशा प्रकारचा कायदा असायला हवा, असंही त्यांनी म्हटलं आहे. या कायद्याद्वारे देशात लोकसंख्या आटोक्यात ठेवली जाऊ शकते.
Published by:News18 Desk
First published: