मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /भीषण! नागपुरच्या हत्याकांडाची पुनरावृत्ती; एक ब्रेकअप आणि तीन मर्डरचा थरार

भीषण! नागपुरच्या हत्याकांडाची पुनरावृत्ती; एक ब्रेकअप आणि तीन मर्डरचा थरार

देश पुन्हा हादरला! भरदुपारी या घरात तिघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, त्यानंतर तरुणानेही स्वत:चाही जीव घेतला.

देश पुन्हा हादरला! भरदुपारी या घरात तिघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, त्यानंतर तरुणानेही स्वत:चाही जीव घेतला.

देश पुन्हा हादरला! भरदुपारी या घरात तिघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, त्यानंतर तरुणानेही स्वत:चाही जीव घेतला.

इंदूर, 10 जुलै : काही दिवसांपूर्वी नागपूरात (Nagpur Crime) थरारक घटना समोर आली होती. एका व्यक्तीने पत्नी, दोन मुलं, सासू आणि मेव्हणीची हत्या करून स्वत: आत्महत्या केली होती. या घटनेनंतर अख्खा महाराष्ट्र हादरला होता. दरम्यान आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमारेषेला लागून असलेल्या बैतूल जिल्ह्यातील एका गावातून असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या तरुणाने प्रेयसी, तिचा मामा आणि शेजारच्यांची हत्या केली. हत्या केल्यानंतर तरुणाने स्वत:वरही गोळी झाडून आत्महत्या (Suicide) केली. या प्रकरणात चौघांचाही मृत्यू झाला आहे. तरुणाचं आणि मृत मुलीचं गेल्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होता. 10 जुलै रोजी तरुणाने एक व्हिडीओ केला, यामध्ये त्याने प्रेयसीने धोका दिल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर तो मुलीच्या घरी गेला आणि तिची हत्या केली. मुलीचा आवाज ऐकून तिचा मामा खोलीतूृन बाहेर आला तर त्यालाही गोळी मारण्यात आली. गोळ्यांचा आवाज ऐकून शेजारील व्यक्ती घरात आला तर त्याच्यावरही तरुणाने गोळ्या झाडल्या. यानंतर त्याने स्वत:वर गोळी झाडून संपवलं.

आरोपीचं नाव भानु ठाकूर आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भानु दुपारी 1 वाजता पिस्तूल घेऊन प्रेयसीच्या घरी गेला. प्रेयसीचे वडील सराफा व्यापारी आहेत. घरी पोहोचताच त्याने बरखा (20) वर गोळी झाडली. मुलीच्या मदतीसाठी आतल्या खोलीतून तिचा मामा बंटी (22) बाहेर आला तर त्याच्यावरही गोळी झाडली. शेवजी आवाज ऐकून लकी पाल हा 18 वर्षांचा तरुण बाहेर आला. त्याचाही तरुणाने जीव घेतला. भानु आणि बरखा दोघेही गेल्या 4 ते 5 वर्षांपासून प्रेमसंबंधात होते. शनिवारी दोघांमध्ये एका विषयावरुन वाद झाला. ज्यानंतर नाराज भानुने पिस्तूल घेऊन प्रेयसीची हत्या केली.

हे ही वाचा-लग्नासाठी महाराष्ट्रातल्या मुलीची केली निवड; मात्र सप्तपदीपूर्वीच नवरी फरार

एक महिन्यांपूर्वी छेडछाडीची केली होती तक्रार...

भानु ठाकूर याच्या विरोधात एक महिन्यांपूर्वी मृत बरखा सोनीने छेडछाडीची तक्रार केली होती. या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली होती. ज्यानंतर आरोपी भानू अधिक आक्रमक झाला होता. शनिवारी तो बरखाच्या घरी पोहोचला. त्याच्या हातात पिस्तूल होती. बरखाच्या मामीला भानुने धमकी दिली होती. यावेळी बरखाचे मामा, मामी, नानी उपस्थित होते. घटनास्थळावरुन पोलिसांना पिस्तूल सापडली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भानुने दोन पिस्तूल आणल्या होत्या. एकातील गोळ्या संपल्यानंतर त्याने दुसरी घेतली. दैनिक भास्करने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

आरोपीचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाला...

हत्याकांडापूर्वी आरोपी भानु ठाकूर यांने 2.50 मिनिटांचा एक व्हिडीओ केला होता. या व्हिडीओमध्ये आरोपी भानुने आपलं दु:ख व्यक्त केलं होतं. तो यात म्हणाला होता, की सोनू खोटं बोलली. 6 ते 7 वर्षे एकत्र राहूनही तिने मला धोका दिला. मी हे दु:ख सहन करू शकत नाही. माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. माझ्यामुळे माझ्या कुटुंबाला त्रास सहन करावा लागला. आरोपीने हत्याकांडासाठी दोन पिस्तूल खरेदी केल्याचं यात सांगितलं.

First published:

Tags: Crime news, Madhya pradesh, Murder, Nagpur