बंगळुरू 11 जुलै : एका राजकीय नेत्याच्या मुलावर गंभीर आरोप झाले आहेत. पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचे फोटो मॉर्फ करून पॉर्न वेबसाईटवर (Porn Site) अपलोड केल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या (West Bengal) हुगली जिल्ह्यातील तृणमूलच्या (TMC) स्थानिक नेत्याच्या मुलावर झाला आहे. इतकंच नाही तर त्यानं मुलीचा फोन नंबरही या साईटवर अपलोड केला होता. अधिकाऱ्यांनी सांगितलं, की ही मुलगी आणि आरोपी यांची आधीपासूनच ओळख होती. मुलीच्या कुटुंबीयांनी जून महिन्यातच बिधाननगर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र पोलिसांनी शनिवारी आयटी अॅक्ट (IT Act) अंतर्गत गुन्हा दाखल करून घेतला.
"बीजेपी विधायक ने मुझे थप्पड़ मारा", यूपी पोलीस अधिकाऱ्याचा Viral Video
पोलीस अधिकारी असलेल्या मुलीचे वडिलांनी म्हटलं, की एक पोलीस अधिकारी असून मला न्याय मिळाला नाही तर सामान्य जनतेचं काय होईल. मुलीनं सांगितलं, की आरोपीच्या या कृत्यानंतर मला केवळ इतर राज्यांतूनच नाही तर बाहेरच्या देशांमधूनही फोन येऊ लागले. या घटनेनंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये राजकीय वाद सुरू झाला आहे.
बहिणीला भेटायला गेली अन्...; सपासप वार करत पतीनंच काढला काटा, पुण्यातील घटना
पश्चिम बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष म्हणाले, की पोलीस निष्क्रीय झाले आहेत. काही चांगल्या अधिकाऱ्यांना टीएमसीनं दूर केलं आहे. कदाचित त्यांनी ते काम केलं नसावं, जे निवडणूकांच्या काळात तृणमूलनं त्यांना करायला सांगितलं. याचीच किंमत त्यांना चुकवावी लागली. पोलीस तरी काय करतील? तर, टीएमसी मंत्री सुजित बोस म्हणाले, की सायबर गुन्हे केवळ पश्चिम बंगालमध्येच होत नाहीत. हे जगभरात होतात. पश्चिम बंगाल पोलीस याप्रकरणी तात्काळ कारवाई करतात. तसंच याच पक्षाचा काहीही हस्तक्षेप नसून सर्व आरोप चुकीचे असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Porn sites, TMC