• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • 8वीच्या मुलीकडे शरीरसुखाची विचारणा; बस वाहकाला मुंबई कोर्टानं सुनावली कठोर शिक्षा

8वीच्या मुलीकडे शरीरसुखाची विचारणा; बस वाहकाला मुंबई कोर्टानं सुनावली कठोर शिक्षा

इयत्ता आठवीच्या वर्गात (8th Grade) शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला (Minor girl) बेस्ट बसमधून प्रवास करत असताना, शरीरसुखाबाबत (Sex) विचारणा करणं एका बस कंडक्टरला (Bus conductor) चांगलंच महागात पडलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 11 जुलै: इयत्ता आठवीच्या वर्गात (8th Grade) शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला (Minor girl) बेस्ट बसमधून प्रवास करत असताना, शरीरसुखाबाबत (Sex) विचारणा करणं एका बस कंडक्टरला (Bus conductor) चांगलंच महागात पडलं आहे. मुंबई सत्र न्यायालयानं संबंधित दोषी बस कंडक्टरला एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर न्यायालयानं आरोपी बस कंडक्टरला 20 हजार रुपयांचा दंडही सुनावला आहे. तसेच भरपाई म्हणून पीडित अल्पवयीन मुलीला 15 हजार रुपये देण्याचा आदेशही दिला आहे. न्यायालयानं पोक्सो कायद्यांतर्गत आरोपीला दोषी ठरवलं आहे. नेमकं प्रकरण काय आहे? 24 जुलै 2018 रोजी 13 वर्षांची अल्पवयीन मुलगी मुंबईतील बेस्ट बसमधून प्रवास करत होती. दरम्यान बसमध्ये प्रवाशांची संख्या कमी होती. यावेळी आरोपी कंडक्टर पीडितेच्या बाजूच्या सीटवर जाऊन बसला. यावेळी त्यानं पीडितेशी लगट करत शरीरसुखाबद्दल काही माहीत आहे का? अशी विचारणा केली. आरोपी कंडक्टरच्या या प्रश्नानं घाबरलेल्या अल्पवयीन मुलीनं असा प्रश्न न विचारण्याची विनंती केली. पण काही वेळानं आरोपी बस वाहकानं हाच प्रश्न दुसऱ्यांदा विचारला. हेही वाचा-पॉर्न साईटवर टाकला पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचा फोटो; या नेत्याच्या मुलावर आरोप यानंतर पीडित मुलीनं याबाबतची माहिती आपल्या एका मैत्रिणीला दिली. मैत्रिणीनं याची माहिती पीडितेच्या आईला दिली. मुलीसोबत घडलेला सर्व प्रकार ऐकल्यानंतर पीडितेच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी तपास करत असताना, सुरुवातीला पीडितेच्या मदतीनं आरोपी कंडक्टरची ओळख पटवली. यानंतर आरोपीला अटक करून पुढील कारवाई सुरू केली. हेही वाचा-11 मिनिटं, 7 बॉम्बस्फोट अन् 189 बळी; मुंबईतील काळ्या घटनेला 15 वर्ष पूर्ण याप्रकरणी सत्र न्यायालयात सरकारी वकील गीता शर्मा यांनी युक्तिवाद करत आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. न्यायालयानं पीडितेचा जबाब लक्षात घेत आरोपीला एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि 20 हजार रुपये दंड ठोठावला आहे. तसेच नुकसान भरपाई म्हणून पीडित मुलीला 15 हजार रुपये देण्याचा आदेशही न्यायालयानं दिला आहे. चंद्रकांत कोळी असं आरोपी बस कंडक्टरचं नाव असून तो मुंबईतील बेस्ट बसमध्ये कार्यरत होता.
  Published by:News18 Desk
  First published: