मराठी बातम्या /बातम्या /पुणे /पुण्यात कोट्यवधींची जागा भाडेतत्त्वावर देण्याचा भाजपचा घाट, अजित पवार नेमके कुणासोबत?

पुण्यात कोट्यवधींची जागा भाडेतत्त्वावर देण्याचा भाजपचा घाट, अजित पवार नेमके कुणासोबत?

पुणे महापालिकेच्या (pune municipal corporation) ताब्यात असलेल्या सुमारे 150 एकर 'ॲमिनिटी स्पेस'ची जागा 99 वर्षांच्या भाडे कराराने देण्याचा प्रस्ताव सत्ताधारी भाजपने तयार केला आहे.

पुणे महापालिकेच्या (pune municipal corporation) ताब्यात असलेल्या सुमारे 150 एकर 'ॲमिनिटी स्पेस'ची जागा 99 वर्षांच्या भाडे कराराने देण्याचा प्रस्ताव सत्ताधारी भाजपने तयार केला आहे.

पुणे महापालिकेच्या (pune municipal corporation) ताब्यात असलेल्या सुमारे 150 एकर 'ॲमिनिटी स्पेस'ची जागा 99 वर्षांच्या भाडे कराराने देण्याचा प्रस्ताव सत्ताधारी भाजपने तयार केला आहे.

पुणे, 07 जून: पुणे महापालिकेच्या (Pune municipal corporation) ताब्यात असलेल्या सुमारे 150 एकर जागेवरील 'ॲमिनिटी स्पेस' (amenity space pune) थेट 99 वर्षासाठी भाडेतत्त्वावर देण्याचा घाट सत्ताधारी भाजपने घातला आहे. महत्त्वाचं म्हणजे, त्यांच्या या निर्णयाला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचाही होकार असल्याचा दावा सत्तारूढ पक्ष नेत्यांकडून केला जात आहे. स्थानिक राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे पदाधिकारी मात्र भाजपच्या या निर्णयाला विरोध करत आहेत.

पुणे महापालिकेच्या ताब्यात असलेल्या सुमारे 150 एकर 'ॲमिनिटी स्पेस'ची जागा 99 वर्षांच्या भाडे कराराने देण्याचा प्रस्ताव सत्ताधारी भाजपने तयार केला आहे. या जागेची किंमत ही आजच्या तारखेला कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. महापालिकेला केवळ 29 वर्षांसाठीच जागा भाडेकराराने देता येत असल्याने 99 वर्षाच्या भाडे करारासाठी राज्य सरकारची परवानगी लागणार आहे.

Mask च्या आगळ्यावेगळ्या डिझाईनमुळे TikToker प्रसिद्धीझोतात, पाहा VIDEO

त्यामुळे सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी अजित पवार यांच्या गळीत हा प्रस्ताव उतरवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. भाजपच्या दाव्यानुसार अजित पवार यांनी या प्रस्तावाला होकार दिला असल्याचं सत्तारूढ पक्ष नेते गणेश बिडकर यांचे म्हणणे आहे. मात्र, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, विरंगुळा केंद्र सांस्कृतिक भवन शाळा यासारख्या कारणांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या या जागा केवळ विकसित करायला पैसे नसल्याने भाडे तत्वावर देण्यात येत असल्याचा खुलासाही सत्तारूढ पक्ष नेते यांनी केला आहे. जर असं असेल तर पुणेकरांसाठी फुफुसाचे काम करणाऱ्या ॲमिनिटी स्पेस पैसे देऊन भाड्याने घेणारे विकसक कशासाठी वापरतील हाही प्रश्न उद्भवतोच.

प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र भाजपने दिल्लीपासून गल्लीपर्यंत वेगवेगळ्या अस्थापना विकायचा सपाटाच लावला असल्याने पुण्यातल्या भाजपचं वेगळे धोरण कसा असेल, अशी बोचरी टीका करत आहेत. काहीही झालं तरी पुणेकरांच्या हक्काच्या जागा भाडेतत्वाच्या नावावर खासगी विकासकांच्या घशात जाऊ देणार नाही, अशी भूमिका ही राष्ट्रवादीने घेतली आहे.

दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर, डॉक्टरांची माहिती

पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना याबाबत विचारलं असता, भाजपचे नेते आपल्याकडे आले होते. ही गोष्ट खरी आहे मात्र त्यांना कुठल्याही स्वरूपाचा होकार किंवा निर्णय अजून दिला नसल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांची भूमिका जाणून घेऊन पुणेकरांसाठी जे हिताचा असेल तेच करू, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

येत्या सात महिन्यात पुणे महापालिकेच्या निवडणुका आहेत अशा परिस्थितीत सत्ताधारी भाजपला मोठ्या योजना राबवण्यासाठी निधीची गरज आहे. मात्र कोणाच्या काळात महापालिकेची आर्थिक स्थिती डळमळीत असल्याने ताब्यात असलेल्या जागांबाबत विक्रीचे धोरण भाजपने घेतल्याचे समजते आता राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी यांच्या भूमिका विरोधाभासी असल्याने अजित पवार नेमके काय करणार? कोट्यवधी रुपयांच्या जमिनीचं नेमक काय होणार असा प्रश्न आहे.

First published:

Tags: Ajit pawar, BJP, Pune, Pune municipal corporation, पुणे