• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • अरे हा कसला मास्क! Mask च्या आगळ्यावेगळ्या डिझाईनमुळे TikToker प्रसिद्धीझोतात, पाहा VIDEO

अरे हा कसला मास्क! Mask च्या आगळ्यावेगळ्या डिझाईनमुळे TikToker प्रसिद्धीझोतात, पाहा VIDEO

टिकटॉकर सध्या चांगलीच चर्चेत आहे, ते तिच्या मास्कमुळे (Woman's manly mask) . विमानात, सुपरमार्केटमध्ये किंवा पार्कमध्येही ती तिचं 'manly mask' घालून फिरते.

 • Share this:
  नवी दिल्ली 07 जून : जगभरात मागील वर्षभरापेक्षा अधिक काळापासून कोरोनानं थैमान घातलं आहे. अशात मास्क हा जवळपास सगळ्यांच्या जीवनाचा जणू अविभाज्य भाग झाला आहे. घरातून बाहेर पडताना प्रत्येकजण न विसरता मास्क घेतोच आणि ते बहुतेक ठिकाणी बंधनकारकही आहे. मात्र, आता यातही काहीतरी फॅशन शोधून काढण्यास लोकांनी सुरुवात केली आहे. बऱ्याचदा अगदी विचित्र पद्धतीचे मास्कही पाहायला मिळाले आहेत. असाच आणखी एक व्हिडिओ (Video Viral) आता समोर आला आहे. VIDEO:अभिनेत्रीलाही मागे टाकणारं सौंदर्य, Viral तरुणीच्या निरागसतेवर नेटकरी फिदा ही टिकटॉकर सध्या चांगलीच चर्चेत आहे, ते तिच्या मास्कमुळे (Woman's manly mask) . विमानात, सुपरमार्केटमध्ये किंवा पार्कमध्येही ती तिचं 'manly mask' घालून फिरते. हे मास्क पाहिल्यास ती पुरुष असून तिनं मास्कच घातलं नाही, असा भास होतो. याच कारणामुळे हे मास्क घालून फिरताना लोक तिच्याकडेच पाहू लागतात. बाहेर लोकांना उपदेश, घरी पत्नीला मारहाण; बुवाच्या राक्षसी अवताराचा VIDEO VIRAL एका व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की या महिलेनं मास्क घातलं आहे, मात्र यामुळे तिला दाढी आणि मिशा आल्याप्रमाणंच भास होतो. मात्र, प्रत्यक्षात तो फक्त एक प्रिंटेड मास्क आहे. या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की तिचं हो मास्क पाहून इतर प्रवासीदेखील तिच्याकडेच पाहात असतात. या शॉर्ट व्हिडिओ क्लिपवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. तर, एखाद्याला फसवण्यासाठी हे मास्क अत्यंत उत्तम असल्याचं काही युझरनं यावर कमेंट करून म्हटलं आहे. व्हिडिओला आतापर्यंत 16 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिलं आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: