Home /News /entertainment /

दिलीप कुमार ऑक्सिजन सपोर्टवर; प्रकृती स्थिर, डॉक्टरांची माहिती

दिलीप कुमार ऑक्सिजन सपोर्टवर; प्रकृती स्थिर, डॉक्टरांची माहिती

Dilip Kumar Health Updates:बॉलिवूडचे ज्येष्ठ नेते दिलीप कुमार (Veteran actor Dilip Kumar) यांची प्रकृती संदर्भातली मोठी अपडेट समोर आली आहे.

    मुंबई, 06 जूनः बॉलिवूडचे ज्येष्ठ नेते दिलीप कुमार (Veteran actor Dilip Kumar) यांची प्रकृती संदर्भातली मोठी अपडेट समोर आली आहे. दिलीप कुमार हे ऑक्सिजन (oxygen support)सपोर्टवर असल्याचं समजतंय. हिंदुजा रुग्णालयाचे डॉक्टरांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार व्हेंटिलेटरवर (Ventilator) नाही तर ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. त्याची प्रकृती आता स्थिर आहे. फुफ्फुसा संदर्भातले काही चाचण्या आम्ही केल्या आहेत त्याचे रिपोर्ट येणं अद्याप बाकी असल्याचं पीडी हिंदुजा हॉस्पिटलमधील पल्मोनोलॉजिस्ट डॉ. डॉक्टर जलील पारकर यांनी सांगितलं. दिलीप कुमार यांना रविवारी सकाळी खार येथील हिंदुजा (PD Hinduja Hospital) रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काल जलील पारकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या फुफ्फुसात (pleural aspiration) पाणी साचलं आहे. त्यामुळं एवढ्या लवकर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्च मिळणं अवघड आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनानं त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दिलीप कुमार यांच्या चाहत्यांनी काळजी करु नये लवकरच ते घरी परततील असं आश्वासनही डॉक्टरांनी दिलं. हेही वाचा- Weather Alert! मुंबईसह कोकणात चार दिवस अतिवृष्टीचा इशारा
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Bollywood actor, Health

    पुढील बातम्या