चंद्रकांत पाटील काल म्हणाले होते मी परत जाईन; आज म्हणाले, मिशन अभी बाकी है दोस्त!

चंद्रकांत पाटील काल म्हणाले होते मी परत जाईन; आज म्हणाले, मिशन अभी बाकी है दोस्त!

अजित पवार यांना आमच्या पक्षाचं काय पडलं आहे. त्यांनी त्यांच्या पक्षाचं बघावं. विशेष म्हणजे पक्षात त्यांच स्थान नेमकं कुठे आहे, याची काळजी करावी.

  • Share this:

पुणे, 26 डिसेंबर: कोल्हापूरला (Kolhapur) परत जाणार या माझ्या वक्तव्यानं हुरळून जाऊ नये. तसेच घाबरुन जाऊ नये. मला पक्षानं जे मिशन दिलंय ते पूर्ण करूनच कोल्हापूरला जाईन. तोपर्यंत पुण्यातच (Pune) राहणार आहे. मग 5 ,10,15,20, 25 वर्षे कितीही लागले तरी. कुणीही दुः खी होऊ नये, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( BJP chandrakant Patil) यांनी शनिवारी स्पष्ट केलं.

चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकाराशी संवाद साधला. ते म्हणाले, अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित पुरस्कार सोहळ्यात मी कोल्हापूरला परत जाणार असं वक्तव्य केलं होतं. त्यावरून उलटसूलट प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण देऊम चर्चेला पूर्णविराम दिला. सोबतच विरोधकांची बोलती बंद केली. मी कोल्हापूरला परत जाणार, यामुळे कुणी हुरळून जाऊ नये. मला पक्षानं सांगितलं पुण्यात कोथरुडला जा, मी आलो. जर म्हटलं कोल्हापूरला जा तर जाणार. बॅग घेऊन तयार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचा..एकनाथ खडसेंनी अखेर सोडलं मौन, ED ची नोटीस मिळाल्यानंतर म्हणाले...

चंदकांतदादा म्हणाले, कोथरुडची निवडणूक केवळ एवढंच माझं मिशन नव्हतं. कोरोनामुळं विकास कामात काही मर्यादा आल्या होत्या. पक्षाचा प्रदेशाध्यक्ष असल्यामुळं कुठेही राहू शकतो. आयुष्यात शेवटी कुठं तरी सेटल व्हावं लागतं. मला कोल्हापूर जिल्ह्यातील खानापूरजवळ माझं मूळ गाव आहे. तिथं सेटल व्हायला आवडेल, असं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितलं. आणि त्याच अर्थानं माझं वक्तव्य होतं. गिरीश बापट यांच्या बोलण्याचा संदर्भ देत बोललो. सेटल कुठं होणार तर कोल्हापूरला असं चंद्रकांतदादांनी सांगितलं.

अजित पवारांचा समाचार...

अजित पवार यांना आमच्या पक्षाचं काय पडलं आहे. त्यांनी त्यांच्या पक्षाचं बघावं. विशेष म्हणजे पक्षात त्यांच स्थान नेमकं कुठे आहे, याची काळजी करावी, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांचा समाचार घेतला. अजित पवार आता बोलू लागले आहेत. त्याला आम्ही उत्तर देणार. हा अॅक्शन-रिअॅक्शनचा चा खेळ आहे. महाराष्ट्रात कुणाला पद देण्याची वेळ आल्यावर शरद पवार कोणालाही देतील. याचा विचार अजित पवारांनी करावा. अजित पवार किंवा सतेज पाटील काय म्हणतात, याचा विचार करण्याची गरज नाही, असा टोला देखील चंद्रकांत पाटील यांनी यावेळी लगावला.

3 पक्ष वेगळे लढणार हे नाटक...

चंद्रकांत पाटील यांनी यांनी यावेळी महाविकास आघाडीवरही निशाणा साधला. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रस हे 3 पक्ष वेगवेगळे लढणार असल्याचं म्हणत आहेत. मात्र ते नाटक आहे. एकत्र आले तर तिकीट वाटपावरून भांडणं होतील.

हे न कळायला आम्ही किंवा कोल्हापूरची जनता मूर्ख नाही, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.

मराठा आरक्षणाचं खापर केंद्रावर फोडणं चुकीचं आहे. ओबीसीमध्ये ( OBC) मराठा समाजाला घालणं हा तोडगा नाही.

गावागावात हाणामाऱ्या होतील. हे सरकारला समजायला हवं. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकार घोळ घालत असल्याचा गंभीर आरोप देखील चंद्रकांतदादांनी यावेळी केला.

हेही वाचा...परंपरा खंडीत.. इतिहासात पहिल्यादा 'ही' यात्रा रद्द, हंडी मटणाला खवय्ये मुकणार

एकनाथ खडसे यांना ED ची नोटीस आली का? या प्रश्नाला उत्तर देताना चंद्रकांतदादा म्हणाले, याबाबत मला माहीत नाही. पण आली असेल तर भाजप तसेच भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर खापर फोडणं अयोग्य आहे.

दरम्यान,  चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा निवडणूक पुण्यातील कोथरुड मतदार संघातून लढवली होती. कोल्हापूर सोडून पुण्यातला सुरक्षित मतदारसंघ निवडल्याच्या कारणावरून विरोधकांकडून त्यांना कायम टार्गेट करण्यात आलं होतं. त्या भाजपमधूनही नाराजीचा सूर निघाला होता.

Published by: Sandip Parolekar
First published: December 26, 2020, 5:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading