जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / परंपरा खंडीत.. इतिहासात पहिल्यादा 'ही' यात्रा रद्द, हंडी मटणाला खवय्ये मुकणार

परंपरा खंडीत.. इतिहासात पहिल्यादा 'ही' यात्रा रद्द, हंडी मटणाला खवय्ये मुकणार

परंपरा खंडीत.. इतिहासात पहिल्यादा 'ही' यात्रा रद्द, हंडी मटणाला खवय्ये मुकणार

नवसाला पावणार दैवत म्हणून भाविक भैरवबाबाला हंडीचं मटण आणि मांड्याचा नैवेद्य देतात.

  • -MIN READ
  • Last Updated :

अमरावती, 26 डिसेंबर: महाराष्ट्र व मध्यप्रदेश सीमेलगत (Maharashtra-madhya Pradesh Border) असलेल्या अमरावती जिल्ह्यातील (Amaraviti) बहिरम (Bahiram) हे छोटसं गाव. या ठिकाणी भैरवबाबाचं जागृत देवस्थान असल्याचं सांगितलं जातं. मोठ्या टेकड्यावर भैरवबाबाचं प्राचिन मंदिर आहे. नवसाला पावणार दैवत म्हणून भाविक भैरवबाबाला हंडीचं मटण आणि मांड्याचा नैवेद्य देतात. मात्र, यंदा ही परंपरा खंडीत झाली आहे. इतिहासात पहिल्यांदा बहिरमची यात्रा रद्द करण्यात आली आहे. हेही वाचा.. काय सांगताsss विदेशी मद्य रिचवण्यात पुणेकर अव्वल, मुंबईकरांना दिला धोबीपछाड दरवर्षी डिसेंबर महिन्यात या ठिकाणी मोठी यात्रा भरते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक यात गर्दी करतात. मात्र यंदा कोरोनाचा सावट असल्याने यात्रात्सव रद्द करण्यात आला आहे. भाविकांना दर्शन मात्र घेता येणार आहे. मंदिर परिसरात गर्दी होऊ नये याकरिता पोलिसांचा फोजफाटा देखील तैनात करण्यात आल्याची माहिती शिरजगाव कसबाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिनसिंग परदेशी यांनी दिली आहे. हंडी मटण आणि मांड्यांना खवय्ये मुकणार… महाराष्ट्रातील सर्वाधिक दिवस 2 महिने चालणारी ही यात्रा. या ठिकाणी व्यावसायिक मोठ्या प्रमाणात येतात. विशेष म्हणजे येथी हंडी मटण आणि मांडे प्रसिद्ध आहे. हंडी मटण आणि मांडे खाण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी लोक येतात. मात्र यंदा या यात्रेवर कोरोनाचं सावट आहे. यात्रा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातीस भाविकांचा हिरमोड झाला आहे. तर हंडी मटण आणि मांड्यांना खवय्यांना मुकवं लागणार आहे. यात्रा रद्द झाल्यानं व्यावसायिकांवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे व्यावसायिक आणि भाविकांमधून नाराजीचा सूर निघत आहे. हेही वाचा… जुन्या स्मार्टफोनवर बंद होणार whatsapp? जाणून घ्या काय आहे सत्य दरम्यान, राज्य सरकारनं कोरोनाचे नियम काही प्रमाणात शिथिल केले असले तरी नियमांची कठोर अंमलबजावणी केली जात आहे. मंदिरं खुली करण्यात आली असली तरी यात्रा, पालखी, वारी, मिरवणूक यांच्यावर बंदी कायम आहे. त्यमुळे यंदा राज्यात कुठेही यात्रा भरणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात