एकनाथ खडसेंनी अखेर सोडलं मौन, ED ची नोटीस मिळाल्यानंतर म्हणाले...

एकनाथ खडसेंनी अखेर सोडलं मौन, ED ची नोटीस मिळाल्यानंतर म्हणाले...

एकनाथ खडसे यांना 30 डिसेंबरला चौकशीसाठी ED कार्यालयात हजर राहण्याबाबत समन्स बजावण्यात आला आहे.

  • Share this:

भुसावळ, 26 डिसेंबर: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (NCP Leader Eknath Khadse) यांनी आपल्याला अंमलबजावणी संचनालयानं (ED) नोटीस मिळाल्याचा खुलासा केला आहे. ED ची नोटीस मिळाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरातून मला जे फोन येत आहेत. त्यातून मोठी सहानुभूती व्यक्त केली जात आहे. लोकांना असं वाटत आहे की हा एक प्रकारचा माझावर अन्याय होत आहे. वारंवार चौकशी करणं, हे लोकांना फारसं पटलेलं नाही, अशी प्रतिक्रिया देखील एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

हेही वाचा...राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांना अर्वाच्च भाषेत धमकी

एकनाथ खडसे भाजपला रामराम ठोकून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP)गोटात सामील झाले आहे. एकनाथ खडसे (Eknath khadse) यांना ED नोटीस बजावल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र, कालपासून एकनाथ खडसे यांनी याबाबत मौन स्वीकारलं होतं. शनिवारी सकाळपासून पत्रकारांनी एकनाथ खडसेंच्या मुक्ताईनगर येथील निवासस्थानाबाहेर गर्दी केली आहे. मात्र, काहीही माहिती देण्यास त्यांनी नकार दिला होता. मात्र अखेर एकनाथ खडसे यांनी मौन सोडून आपल्याला नोटिस मिळाल्याचा खुलासा केला आहे.

काय म्हटलं आहे नोटिशीत..?

एकनाथ खडसे यांना 30 डिसेंबरला चौकशीसाठी ED कार्यालयात हजर राहण्याबाबत समन्स बजावण्यात आला आहे. पुण्यातील भोसरी येथील भूखंड गैरव्यवहार प्रकरणात ED नं एकनाथ खडसे यांना नोटीस बजावल्याचं बोलले जात आहे. मात्र, तरीही एकनाथ खडसे यावर बोलणं टाळत होते. दरम्यान, एकनाथ खडसे जळगाव येथे पत्रकार परिषद घेणार असल्याचं समजतं. आता एकनाथ खडसे पत्रकारांशी काय संवाद साधतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा...काय सांगताsss विदेशी मद्य रिचवण्यात पुणेकर अव्वल, मुंबईकरांना दिला धोबीपछाड

ईडीची चौकशी लावली तर मी सीडी लावेन...

एकनाथ खडसे भाजपमध्ये नाराज होते. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आपली ED कडून चौकशी केली जाऊ शकते, असा अंदाज देखील खडसेंनी होता. 'त्यांनी ईडीची चौकशी लावली तर मी सीडी लावेन, असा इशारा देखील एकनाथ खडसे यांनी भाजपला उद्देशून दिला होता. त्यामुळे आता खरंच एकनाथ खडसे सीडी लावतात का? आणि या सीडीतून कोणाचा भांडाफोड करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: December 26, 2020, 3:33 PM IST

ताज्या बातम्या