मराठी बातम्या /बातम्या /पुणे /पुण्यात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी? कसबा मतदारसंघावर काँग्रेस आणि ठाकरे गटाचा दावा

पुण्यात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी? कसबा मतदारसंघावर काँग्रेस आणि ठाकरे गटाचा दावा

नाना पटोले, उद्धव ठाकरे

नाना पटोले, उद्धव ठाकरे

पुण्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे. कसबा मतदारसंघावर काँग्रेससोबतच ठाकरे गटाकडून देखील दावा करण्यात आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune (Poona) [Poona], India

पुणे, 30 जानेवारी :  पुण्यामधून मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे. भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे पुण्यातील कसबा विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीवरून आता महाविकास आघाडीमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाकडून कसबा विधानसभा मतदारसंघावर दावा सांगण्यात येत आहे. काँग्रेसचे नेते बालासाहेब धाबेकर यांनी या विधानसभेच्या जागेवर दावा केला असून, त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांना नाश्ता करण्यासाठी घरी बोलावत शक्तिप्रदर्शनाला सुरुवात केली आहे.

काँग्रेसकडून शक्तिप्रदर्शन  

माजी आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे कसबा विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर काँग्रेसचे नेते बालासाहेब धाबेकर यांनी दावा केला आहे. त्यांनी याच पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांना नाश्ता करण्यासाठी घरी देखील बोलावलं. तर दुसरीकडे  शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे यांच्याकडून देखील कसबा मतदारसंघावर दावा करण्यात आला आहे. कसब्याची जागा ही ठाकरे गटालाच मिळावी यासाठी संजय मोरे यांचे प्रयत्न सुरू आहेत. कसबा विधानसभा पोटनिवडणूक लढवण्यासाठी महाविकास आघाडीमधून एकूण 9 जण इच्छूक आहेत, त्यामध्ये काँग्रेसचे तीन, ठाकरे गटाचे पाच तर राष्ट्रवादीच्या एका इच्छुकाचा समावेश आहे. त्यामुळे आता या पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपकडून बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न 

दरम्यान दुसरीकडे कसबा आणि चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी यासाठी भाजपकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. मुक्ता टिळक यांच्या कुटुंबाकडून देखील कसबा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली आहे. मात्र पक्षादेश अंतिम असेल त्यामुळे पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असल्याचं टिळक यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आलं आहे.

First published:

Tags: BJP, Congress, NCP, Pune, Pune news, Shiv sena