जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / BREAKING : जामनेरला निघालेल्या विमान प्रवासात मोठी घटना, मुख्यमंत्र्यांचं विमान मुंबईला परतले

BREAKING : जामनेरला निघालेल्या विमान प्रवासात मोठी घटना, मुख्यमंत्र्यांचं विमान मुंबईला परतले

BREAKING : जामनेरला निघालेल्या विमान प्रवासात मोठी घटना, मुख्यमंत्र्यांचं विमान मुंबईला परतले

या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईहून जामनेर येथे जाण्यासाठी विमानाने निघाले होते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 30 जानेवारी : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र विमानाने निघाले होते. पण खराब हवामानामुळे विमानाला माघारी परतावे लागले आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे गोंधळ उडाला आहे. गोर बंजारा लमाण नाईकडा समाजाच्या धर्म कुंभाचा आज समारोप आहे. गेल्या पाच दिवसांपासून या कुंभामध्ये अनेक धार्मिक कार्यक्रम झाले.. या धर्मकुंभासाठी देशभरातून समाजाचे बंधन एकत्रित झाले आहेत. आज समारोपाच्या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि योगगुरू बाबा रामदेव हे सुद्धा उपस्थित राहणार होते. (आदित्य ठाकरेंच्या वरळी शिंदे गटाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’, पहिला नगरसेवक लागला गळाला) या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईहून जामनेर येथे जाण्यासाठी विमानाने निघाले होते. विमानाने उड्डाण सुद्धा घेतले. मात्र मार्गात हवामान खराब असल्याने (Air Pressure) विमानाला परत माघारी यावे लागले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. ( खरी शिवसेना कोणाची आजच होणार निर्णय? निकालाकडे राज्याचं लक्ष ) मुंबई विमानतळावर विमानाचे सुखरूप लँडिंग झाले आहे. मुंबईत परत आल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे आपल्या बंगल्याकडे निघाले आहे. तर मुख्यमंत्री शिंदे सुद्धा वर्षा बंगल्याकडे रवाना झाले आहे. त्यामुळे जामनेरचा दौरा रद्द करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात