मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /आदित्य ठाकरेंच्या वरळी शिंदे गटाचा 'सर्जिकल स्ट्राईक', पहिला नगरसेवक लागला गळाला

आदित्य ठाकरेंच्या वरळी शिंदे गटाचा 'सर्जिकल स्ट्राईक', पहिला नगरसेवक लागला गळाला


वरळीचे आमदार आदित्य ठाकरेंना वरळी विधानसभेत मोठा धक्का बसला आहे. वरळीचे माजी नगरसेवक

वरळीचे आमदार आदित्य ठाकरेंना वरळी विधानसभेत मोठा धक्का बसला आहे. वरळीचे माजी नगरसेवक

वरळीचे आमदार आदित्य ठाकरेंना वरळी विधानसभा मतदारसंघात मोठा धक्का बसला आहे. वरळीचे माजी नगरसेवक...

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 30 जानेवारी : मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदे गट आणि भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आता आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातून माजी नगरसेवकाने शिंदे गटात प्रवेश केला आहे.

वरळीचे आमदार आदित्य ठाकरेंना वरळी विधानसभा मतदारसंघात मोठा धक्का बसला आहे. वरळीचे माजी नगरसेवक संतोष खरात यांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. आमदार आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातला पहिला नगरसेवक शिंदे यांच्या गटात सामील झाला आहे.

(खरी शिवसेना कोणाची आजच होणार निर्णय? निकालाकडे राज्याचं लक्ष)

संतोष खरात हे वरळीतील वॅार्ड क्रमांक १९५ मधील नगरसेवक होते. शिवसेनेचे नेते समाधान सरवणकर, शीतल म्हात्रेंच्या पाठोपाठ आता संतोष खरातही बाळासाहेबांच्या शिवसेनेत सहभागी झाले आहे. आदित्य ठाकरेंच्याच मतदारसंघातला माजी नगरसेवक गेल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

ठाण्यात राष्ट्रवादीचे 22 नगरसेवक शिंदे गटाचा वाटेवर

दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष टार्गेटवर आला आहे. तब्बल 22 नगरसेवक राष्ट्रावादी पक्षाची साथ सोडणार अशी माहिती समोर आली आहे. हा गट वेगळा गट स्थापन करणार अथवा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार अशी शक्यता आहे. या 22 पैकी 6 नगरसेवक लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहे. हे 6 ही नगरसेवक दिग्गज आहे.

('लबाड बोका ढोंग करतोय' ठाण्यात शिंदे गट आणि राष्ट्रवादीत बॅनर वार)

विशेष म्हणजे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना शह देण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची मोठी खेळी मानली जात आहे. मुंब्रा आणि कळवा येथील अनेक नगरसेवकांसह शेकडो NCP पदाधिकारी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वाटेवर आहे. ठाणे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांची शिवसेना पक्ष इतर पक्षांना सुरुंग लावण्याच्या तयारीत आहे.

First published:

Tags: Aaditya Thackeray, Shivseana