मराठी बातम्या /बातम्या /पुणे /5 दिवसांची झुंज संपली, 13 वर्षांच्या शिवभक्त आर्यनने सोडले प्राण, पुणे हळहळलं

5 दिवसांची झुंज संपली, 13 वर्षांच्या शिवभक्त आर्यनने सोडले प्राण, पुणे हळहळलं

मल्हार गडावरून मावळात शिवज्योत घेऊन परत येत होते. त्यावेळी टेम्पोला ट्रकने  मागून धडक दिली होती

मल्हार गडावरून मावळात शिवज्योत घेऊन परत येत होते. त्यावेळी टेम्पोला ट्रकने मागून धडक दिली होती

मल्हार गडावरून मावळात शिवज्योत घेऊन परत येत होते. त्यावेळी टेम्पोला ट्रकने मागून धडक दिली होती

गणेश दुडम, प्रतिनिधी

पुणे, 16 मार्च : पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये काही दिवसांपूर्वी शिवभक्तांच्या टेम्पोचा भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये 30 ते 35 शिवभक्त जखमी झाले होते. मात्र गंभीर जखमीपैकी आर्यन कोंडभर या 13 वर्षांच्या शिवभक्ताचा उपचारादरम्यान ओझस हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे.

शिवजयंतीच्या दिवशी 10 मार्चला मल्हार गडावरून मावळात शिवज्योत घेऊन परत येत होते. त्यावेळी टेम्पोला ट्रकने ताथवडे येथे मागून धडक दिली होती. या अपघातात 30 ते 35 शिवभक्त जखमी झाले होते. काही किरकोळ होते त्यांच्यावर उपचार करून सोडण्यात आले, मात्र गंभीर जखमीपैकी आर्यन कोंडभर (वय 13) या शिवभक्ताचा उपचारासाठी ओझस हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. गेल्या 5 दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते.

(किरकोळ वादातून महिलेने बस चालकाचं डोकं फोडलं; भाजपची माजी नगरसेवक असल्याचा दावा)

मात्र, आज उपचारादरम्यान, आर्यन कोंडभर याचा मृत्यू झाला. त्याच्या छातीला आणि मेंदूला जबर मार लागला होता. त्याच्या मेंदूवर शस्त्रक्रिया झाली होती मात्र आज दुपारी त्याची प्राणज्योत मालवली. त्यामुळे संपूर्ण मावळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

नेमकं काय घडलं?

( नवऱ्यासमोरच महिला प्रवाशासोबत....; धावत्या ट्रेनमध्ये टीसीचं लज्जास्पद कृत्य)

10 मार्चला मल्हारगडावरून शिवज्योत घेऊन हे शिवभक्त एका खासगी टेम्पोने लोणावळ्यामधली शिलाटणे येथे निघाले होते. टेम्पो बंगळूरू -मुंबई बायपासला आल्यानंतर या टेम्पोला मागून कंटेनरने धडक दिली. ताथवडे परिसरात हा अपघात झाला होता. या अपघातामध्ये 30 ते 35 शिवभक्त जखमी झाले. त्यापैकी दहा जणांची प्रकृती गंभीर होती. तर वीस जण किरकोळ जखमी झाले होते. जखमींना उपचारासाठी तीन वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.

First published:

Tags: Accident, Pune, Pune accident