लखनऊ, 14 मार्च : विमान प्रवासात सहप्रवासी महिलेच्या अंगावर लघुशंका केल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता रेल्वे प्रवासातही अशाच प्रकारची घटना घडली आहे. अकाल तख्त एक्सप्रेसमध्ये रविवारी (12 मार्च) एका मद्यधुंद टीसीनं महिलेच्या डोक्यावर लघुशंका केल्याचा आरोप रेल्वे पोलीस अधिकाऱ्यानं केला आहे. अमृतसरहून कोलकाता इथं जाणाऱ्या अकाल तख्त एक्स्प्रेसमध्ये रविवारी (12 मार्च) मध्यरात्री ए1 डब्यामध्ये हा प्रकार घडला.
पती राजेश कुमार यांच्यासोबत महिला या रेल्वेतून प्रवास करत होती. मध्यरात्री मद्यधुंद अवस्थेतील टीसीनं महिलेच्या डोक्यावर लघवी केली. महिलेनं आरडाओरडा केल्यावर तिथे सहप्रवासी गोळा झाले व त्यांनी त्या टीसीला धरलं. मुन्ना कुमार असं त्या टीसीचं नाव असून, तो बिहारचा रहिवासी आहे. चारबाग रेल्वे स्टेशनवर सोमवारी (13 मार्च) त्या टीसीला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं.
शॉपिंगला गेला नवरा, बायकोने उचललं धक्कादायक पाऊल; पती घरी परतताच...
ही घटना रविवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास ट्रेनमध्ये घडली. महिला अमृतसरची निवासी असून पतीसोबत कोलकाता इथं जात होती. मध्यरात्री दारूच्या नशेत आलेल्या टीसीनं तिच्या डोक्यावर लघुशंका केली. महिलेनं आरडाओरडा केल्यानं आजूबाजूच्या प्रवाशांनी त्या टीसीला बाजूला घेऊन त्याला मारही दिला. जीआरपी (Government Railway Police) इन्स्पेक्टरच्या म्हणण्यानुसार राजेश यांच्या तक्रारीवरून टीसी मुन्ना कुमार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरपीएफ कंट्रोल रूम आणि ट्विटरच्या माध्यमातून रेल्वे पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. रेल्वे लखनऊला पोहोचताच त्या टीटीई अधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आलं. आरोपी मुन्ना कुमार याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलंय. त्यानं गुन्ह्याची कबुलीही दिली आहे. नशेत असल्यामुळे ही चूक झाल्याचं त्यानं कबूल केलं आहे.
तिकीट तपासणाऱ्या टीटीईलाच रेल्वेतून खाली फेकण्याची धमकी, पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल
या आधी विमान प्रवासात सहप्रवासी महिलेच्या अंगावर लघुशंका केल्याची घटना समोर आली होती. लंडनहून येणाऱ्या विमानात दारूच्या नशेत असलेल्या प्रवाश्याने सहप्रवासी महिलेच्या अंगावर लघवी करून तिच्याशी गैरवर्तनही केलं होते. दरम्यान आता रेल्वे प्रवासातही अशीच घटना समोर आल्यानं प्रवासातल्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय. रेल्वेमधून अनेक सामान्य नागरिक दररोज प्रवास करतात. बरेचदा काही महिला प्रवासी एकट्यानंही प्रवास करतात. रात्रीच्या वेळी प्रवासात मद्यधुंद नागरिकांचा त्रास प्रवाशांना होऊ शकतो. मात्र रेल्वे अधिकाऱ्यांकडूनच अशा प्रकारे कृत्य होत असेल, तर त्याबाबत रेल्वेकडून कडक कारवाई करण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Railway, Train, Uttar pardesh