मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /मोठी बातमी! शिवज्योत घेऊन निघालेल्या शिवभक्तांच्या टेम्पोचा भीषण अपघात; 35 जखमी

मोठी बातमी! शिवज्योत घेऊन निघालेल्या शिवभक्तांच्या टेम्पोचा भीषण अपघात; 35 जखमी

पुण्यात भीषण अपघात

पुण्यात भीषण अपघात

मल्हारगडावरून शिवज्योत घेऊन हे शिवभक्त एका खासगी टेम्पोने लोणावळ्यामधली शिलाटणे येथे निघाले होते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune (Poona) [Poona], India

पुणे, 10 मार्च :  पुणे जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. शिवभक्तांच्या टेम्पोचा भिषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 30 ते 35 शिवभक्त जखमी झाले आहेत. यापैकी दहा जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. तर वीस जणांना किरकोळ मार लागला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीनं जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बंगळुरू- मुंबई बायपासवर ताथवडे परिसरात हा अपघात झाला.

ताथवडे परिसरात भीषण अपघात 

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मल्हारगडावरून शिवज्योत घेऊन हे शिवभक्त एका खासगी टेम्पोने लोणावळ्यामधली शिलाटणे येथे निघाले होते. टेम्पो बंगळूरू -मुंबई बायपासला आल्यानंतर या टेम्पोला मागून कंटेनरने धडक दिली. ताथवडे परिसरात हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 30 ते 35 शिवभक्त जखमी झाले. त्यापैकी दहा जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. तर वीस जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तीन वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अपघाताचं कारण अस्पष्ट 

मल्हारगडावरून शिवज्योत घेऊन हे शिवभक्त एका खासगी टेम्पोने लोणावळ्यामधली शिलाटणे येथे निघाले होते. मात्र ताथवडे परिसरात त्यांच्या टेम्पोला मागून कंटेनरले धडक दिली. यात तीस ते पसत्तीस जण जखमी झाले आहेत. या अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

First published:
top videos

    Tags: Accident, Chatrapati shivaji maharaj, Pune, Pune accident